Vastu Tips : वास्तुशास्त्रानुसार देवघरात शंख ठेवणे शुभ की, अशुभ? वाचा फायदे

Significance Of Shankh :

हिंदू धर्मात शंखला महत्त्वाचे स्थान आहे. सनातन धर्मात देवाचे आशीर्वाद मिळवण्यासाठी आणि त्यांना प्रसन्न करण्यासाठी अनेक प्रकारे पूजा केली जाते. पूजा सुरू करण्यापूर्वी अनेकदा शंखनाद किंवा घंटानाद केला जातो.

पूजा आणि शुभकार्यात शंख फुकण्याची परंपरा आहे. शास्त्रानुसार शंख फुकल्याने सुख-समृद्धीसह अनेक लाभ मिळतात. तसेच घरात नेहमी आशीर्वाद राहतात. शंखाकडे सभोवतालचे वातावरण शुद्ध करण्याचे, धार्मिक कार्यासाठी वापरले जाणारे साधन म्हणून पाहिले जाते.

शंखाला श्रीवत्सपुत्र म्हणूनही ओळखले जाते, जे भगवान विष्णूला शरण जाण्याचे प्रतीक आहे. शंख ही हिंदू धर्मातील एक महत्त्वाची उपासना सामग्री आहे. जी पूजा आणि उपासनेमध्ये वापरली जाते. शंख वाजवल्याने अशुभ आणि नकारात्मक ऊर्जा दूर होते. जाणून घेऊया त्याचे आध्यात्मिक फायदे

1. धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व

शंख हे भगवान विष्णूचे प्रतीक आहे. धर्मग्रंथामध्ये ते पवित्र मानले जाते. तसेच घरात शुभ आणि आध्यात्मिक ऊर्जा पसरवण्यासाठी उपासनेत वापरले जाते. शंख फुकल्यानंतर निर्माण होणारा आवाज ओम सारखाच असतो. जो विश्वासाचा मूळ ध्वनी मानला जातो. हा मनाला शांत करतो, यामुळे एकाग्रता वाढते आणि नकारात्मक ऊर्जा दूर होते. शंखाचा उपयोग पूजेत जल अर्पण, आरती आणि मंत्रोच्चारात केला जातो. त्यामुळे भक्तीची भावना वाढते. तसेच अध्यात्मिक प्रगती होण्यास मदत होते.

2. वास्तुशास्त्रानुसार शंखाचे महत्त्व

वास्तुशास्त्रानुसार शंख शुभ मानला जातो. घरात शंख ठेवल्याने वास्तुदोष दूर होतात. सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वाढतो.
शंख घराचा मुख्य दरवाजा, देवघर किंवा अभ्यासाच्या खोलीत ठेवावा.
घरातील कोणत्याही भागात वास्तूदोष तयार झाला असेल तर त्या भागात शंख ठेवा. असे केल्याने सकारात्मक ऊर्जा निर्माण होऊन वास्तूदोष कमी होतो.
घराच्या मुख्य दरवाजाजवळ शंख ठेवल्याने नकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करत नाही. सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वाढतो.

टीप :
ही सर्व माहिती भाविकांची श्रद्धा लक्षात घेऊन दिली जात आहे, तुमच्या श्रद्धा आणि विश्वासावर ज्योतिष उपाय आणि सल्ला वापरून पाहा. याचा उद्देश फक्त तुम्हाला चांगला सल्ला देणे आहे. या संदर्भात आम्ही कोणताही दावा करत नाही.

Source link

Shankh Benefits In VastushashtraSignificance And Benefit Of ShankhSignificance Of ShankhSpiritual Importance Of Shankhवास्तु टिप्सवास्तुशास्त्रशंखाचे फायदे
Comments (0)
Add Comment