Eye Twitching : डावा किंवा उजवा डोळा फडफडणे शुभ की, अशुभ? दुर्लक्ष करु नका, येऊ शकते भयंकर संकट

Vastu Tips Eye Twitching:

डोळे फडफडणे हल्ली वैज्ञानिकदृष्ट्या सामान्य बाब झालीये आहे. परंतु, धार्मिकतेनुसार आजही काही गोष्टींना फार मानले जाते. डोळा हा मानवी जीवनातील सगळ्यात संवेदनशील आणि महत्त्वाचा अवयव आहे.

बरेचदा काही सेकंदासाठी डोळा १ ते २ मिनिटांपर्यंत फडफडतो. डोळा फडफडणे यामागे शुभ किंवा अशुभ कारणे जोडली जातात. वास्तुशास्त्रानुसार डोळे फडफडल्याने शुभ आणि अशुभ असे दोन्ही प्रकारचे संकेत मिळतात. वास्तुनुसार तुमचा कोणता डोळा फडफडतो यावर अनेक गोष्टी अवलंबून असतात. जाणून घेऊया स्त्रिया आणि पुरुषांच्या उजवा किंवा डावा डोळे फडफडणे किती चांगले आहे.

1. पुरुषांचा उजवा किंवा डावा डोळा फडफडणे

वास्तुशास्त्रानुसार पुरुषांचा उजवा डोळा फडफडणे शुभ मानले जाते. जर एखाद्या पुरुषाचा उजवा डोळा फडफडत असेल तर लवकरच त्याला आनंदाची बातमी मिळण्याचे संकेत असतात. तसेच आर्थिक लाभ, मित्राला भेटण्याचे संकेत किंवा कामात यश हे देखील लक्षण असू शकते. तर पुरुषांचा डावा डोळा फडफडणे अशुभ मानले जाते. यामुळे वाद, अतिरिक्त खर्च किंवा कामात अडथळे येण्याचे लक्षण मानले जाते. तसेच कुटुंबातील कोणाशीही मतभेद होऊ शकतात.

2. स्त्रियांचा उजवा किंवा डावा डोळा फडफडणे

स्त्रियांचा डावा डोळा फडफडणे शुभ मानले जाते. जर एखादा स्त्रीचा डावा डोळा फडफडत असेल तर चांगली बातमी मिळू शकते. तसेच अपूर्ण इच्छा पूर्ण होऊ शकतात असे म्हटले जाते. तर उजवा डोळा फडफडणे संकटाची चाहूल म्हटले जाते. यामुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागतो.

3. वैज्ञानिक कारण काय?

वैज्ञानिकदृष्ट्या थकवा, तणाव, कॅफिन किंवा अल्कोहोलचे अतिप्रमाणात सेवन केल्यामुळे डोळे फडफडतात. असे वारंवार होत असतील डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. वास्तुशास्त्रात याबद्दल काही उपाय देखील आहे ज्यामुळे याचा अशुभ प्रभाव कमी करता येतो. पुरेशी झोप घ्या, तणाव टाळ्ल्याने हे बरे होते

टीप : ही सर्व माहिती भाविकांची श्रद्धा लक्षात घेऊन दिली जात आहे, तुमच्या श्रद्धा आणि विश्वासावर ज्योतिष उपाय आणि सल्ला वापरून पाहा. याचा उद्देश फक्त तुम्हाला चांगला सल्ला देणे आहे. या संदर्भात आम्ही कोणताही दावा करत नाही.

Source link

Eye TwitchingRight And Left Eye Twitching in Male and FemaleSpiritual ImportanceVastu Tipsवास्तु टिप्सवास्तुशास्त्र
Comments (0)
Add Comment