Lord Ganesh 3 Favorite Zodiac Signs:
बुधवार म्हटलं की, अनेक भक्तगण श्रीगणेशाची आराधना करतात. गणपतीचा आशीर्वाद घेण्यासाठी व्रत- वैकल्य करुन पूजा उपासना करतात. बुधवार हा दिवस श्रीगणेशाला समर्पित करण्यात आला आहे.
कोणतेही शुभ कार्यात श्रीगणेशाला प्रथम पूजले जाते. श्रीगणेशाची पूजा करण्याची विशेष परंपरा आहे. श्रीगणेशाची आराधना केल्याने अनेक संकटांपासून मुक्ती मिळते असे म्हटले जाते. श्रीगणेशाची अनेक रुपे आहेत त्याला विघ्नहर्ता म्हणूनही ओळखले जाते.
ज्योतिषशास्त्रानुसार काही राशी अशा आहेत ज्या श्रीगणेशाला अतिप्रिय आहेत. यांच्यावर बुद्धीच्या देवताची कृपा कायम असते. जाणून घेऊया त्या राशींबद्दल सविस्तर
1. मेष
ज्योतिषशास्त्रानुसार मेष रास ही श्रीगणेशाच्या आवडीची रास आहे. या राशीचा स्वामी मंगळ ग्रह आहे. मंगळ हा धैर्य, शौर्य इत्यादींचा कारक मानला जातो. मंगळाच्या प्रभावामुळे या राशीचे लोक बुद्धिमान आणि धैर्यवान मानले जाते. श्रीगणेशाच्या कृपेने या राशीच्या लोकांचे बहुतेक काम यशस्वी होते. श्रीगणेशाला प्रसन्न करण्यासाठी बुधवारी लाल जास्वंदीचे फूल अर्पण करा. असे केल्याने आर्थिक चणचणपासून सुटका होते.
2. मिथुन
ज्योतिषांच्या मते मिथुन राशीच्या लोकांवर श्रीगणेश नेहमी प्रसन्न असतात. बुध या राशीचा स्वामी आहे. बुध हा ग्रह व्यवसाय, तर्क, संवाद आणि बुद्धिमत्तेचा कारक मानला जातो. या राशीचे लोक निर्णय घेण्यात पारंगत असतात. तसेच स्वभावाने उदार मानले जातात. श्रीगणेशाला बुधवारी शेंदूर अर्पण करणे शुभ मानले जाते.
3. मकर
मकर राशीचा स्वामी शनि ग्रह आहे. ज्योतिषशास्त्रानुसार शनि देव हे न्यायाचे शासक मानले जातात. या राशीच्या लोकांवर श्रीगणेशाचा आशीर्वाद असतो. या राशीचे लोक मेहनती असतात. प्रत्येक काम करण्याची क्षमता त्यांच्यात असते. हे लोक आपल्या बुद्धितमत्तेच्या जोरावर पैसा कमावाण्यात यशस्वी होतात. बुधवारी श्रीगणेशाला पिवळे लाडू अर्पण करा. असे केल्याने अनेक मनोकामना पूर्ण होतात.
टीप : ही सर्व माहिती भाविकांची श्रद्धा लक्षात घेऊन दिली जात आहे, तुमच्या श्रद्धा आणि विश्वासावर ज्योतिष उपाय आणि सल्ला वापरून पाहा. याचा उद्देश फक्त तुम्हाला चांगला सल्ला देणे आहे. या संदर्भात आम्ही कोणताही दावा करत नाही.