वर्गात शिकवायला येणे केलं बंद
संजीदा कादर असे या शिक्षिकेचे नाव असून त्या एलजेडी लॉ कॉलेजमध्ये शिकवत असे. मिळालेल्या माहितीनुसार ३१ मे रोजी तिला कॉलेजच्या अधिकाऱ्यांनी हिजाब घालून न येण्यास सांगितले होते. परंतु कादर यांनी थेट राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. कादर या मार्च-एप्रिलपासूनच हिजाब घालून कॉलेजमध्ये येत असल्याच्या बातम्या आजूबाजूच्या परिसरात प्रसिद्ध झाल्या होत्या. परंतु गेल्या आठवड्यापासून त्यांना त्रास वाढू लागल्याचे कादर यांनी सांगितले आहे.
कॉलेजने दुपट्टा किंवा स्कार्फ वापरण्याची दिली होती परवानगी
या संपूर्ण प्रक्ररणासंदर्भात कॉलेज गव्हर्निंग बॉडीचे अध्यक्ष गोपाल दास यांनी पीटीआय या वृत्तसंस्थेला याबाबतची अधिकची माहिती दिली आहे. ते म्हणाले की, आम्ही त्यांना हिजाब घालण्यापासून रोखले हा गैरसमज आहे. कादर यांना डोके झाकण्यापासून आम्ही कधीच रोखले नाही. आम्ही त्यांना ईमेल केला होता त्यात असं लिहिलं होतं की, सर्व स्टाफ मेंबर्ससाठी सेट केलेल्या ड्रेस कोडनुसार त्या क्लासेस घेताना डोके झाकण्यासाठी दुपट्टा किंवा स्कार्फ वापरू शकतात.” मात्र, तरी सुद्धा कादर यांनी कॉलेज मध्ये शिकवायला जाणार नसल्याचे सांगितले आहे.
हिजाब बंदी हा वादाचा विषय
दरम्यान २०२२ च्या सुरुवातीला हिजाब बंदीमुळे कर्नाटकात बराच गदारोळ झाला होता. मुस्लीम विद्यार्थिनींना हिजाब घातल्यामुळे त्यांना कॉलेजमध्ये प्रवेश न दिल्याने हा वाद सुरू झाला. त्या दरम्यान अनेक निदर्शने झाली. परत निदर्शनाच्या विरोधात निदर्शने झाली. यानंतर राज्य सरकारने शाळांमध्ये सर्व धार्मिक पोशाखांवर बंदी घातली. प्रकरण न्यायालयात गेले. कर्नाटक उच्च न्यायालयाने ही बंदी कायम ठेवली. मात्र राज्यात सत्ताबदल होताच नवीन सरकारने डिसेंबर २०२३ मध्ये ही बंदी हटवली.