नदीत वाहत आलेला मृतदेह पाहून आले पोलीस, बाहेर काढले तर झाला जिवंत, व्हिडिओ पाहून सर्वांना आले हसू..

मुंबई : तेलंगणातील एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये पोलीस नदीतून एका व्यक्तीला बाहेर काढताना दिसत आहेत. सुरुवातीला नदीत एक मृतदेह तरंगत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. अशी माहिती मिळताच तातडीने पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि बचावकार्य सुरू केले. व्हिडिओमधील आश्चर्याची गोष्ट म्हणजे, कथित प्रेत म्हणून असलेली व्यक्ती जिवंतअसल्याचे आढळून आले. हणमकोंडा शहरात घडलेली ही घटना सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून, लोकांच्या विविध प्रतिक्रिया उमटत आहेत.

प्रिया सिंह नावाच्या युजरने हा व्हिडिओ एक्स (Twitter) सोशल मीडियावर शेअर केला आणि अवघ्या काही मिनीटात मजेशीर कमेंट येण्यास सुरुवात झाली. प्रियाने पोस्ट शेअर करताना लिहले “जग विचित्र माणसांनी भरलेलं आहे. भावाने उष्णतेपासून आराम मिळवण्यासाठी थेट पाण्यात पडून राहण्याची युक्ती लढवली पण, पोलिस कर्मचाऱ्याला वाटलं की हा तरंगणारा मृतदेह आहे. बाहेर काढल्यावर व्यक्ती जिवंत सापडली”, तर यावर कमेंट करताना एका युजरने विनोदीपणे टिप्पणी केली, “हाहाहा… भाऊ मजा आली,” तर दुसऱ्याने लिहिले, “बिचारा एसी स्फोटने घाबरला असेल.”
Fact Check: …तेव्हा मंदिराच्या जागी मशीद बांधू, मुस्लिम व्यक्तीकडून हिंदूंवर टीका? व्हायरल व्हिडिओचे सत्य काय?

पोलिसांनी तरुणाची चौकशी केली असता, तो तलावात आराम करत असल्याचे त्याने स्पष्ट केले. युवकाने पुढे अशी माहिती दिली की तो कावली, नेल्लोर जिल्ह्यातील राहतो आणि काझीपेठ येथील ग्रॅनाइट कंपनीत कामला आहे. आपल्या कामावरुन सुटल्यानंतर युवकाला खूप गरम वाटत असल्याने त्याने थंड होण्यासाठी नदीत झोपण्याचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे, कामावरुन काझीपेठला परत जाण्यासाठी आपल्याकडे पुरेसे पैसे नसल्याचा उल्लेख युवकाने तपासात केला, आणि परत जाण्यासाठी पोलिसांकडे त्यांनी तब्बल ५० रुपयांची उधारी द्या अशी मागणी केली.

सोशल मीडियावर भन्नाट व्हिडिओने साऱ्याचे लक्ष वेधून घेतले आहे, प्रिया सिंह यांनी पोस्ट केल्यानंतर अनेक सोशल मीडिया अकाउंटवर हाच व्हिडिओ पुन्हा शेअर करण्यात आला पण प्रत्येकाने आणखी भन्नाट मॅसेज टाकून व्हिडिओ व्हायरल केलाय.

Source link

man drowned in riverpolice found death bodyriver videotelangana viral videoviral video
Comments (0)
Add Comment