कंपनीने AI फिचर्ससोबतच कॉल रेकॉर्डिंगचे फिचर देखील जोडले आहे, जे फोन ॲपवरून थेट ऍक्सेस केले जाऊ शकते. यासाठी तुम्हाला इतर कोणत्याही ॲपची गरज भासणार नाही. आयफोनवर यापूर्वी कॉल रेकॉर्डिंग फीचर उपलब्ध नव्हते, त्यामुळे अनेक यूजर्स त्रस्त झाले होते.
यावेळच्या iOS अपडेटमध्ये ॲपलकडून अनेक नवीन फीचर्स देण्यात आले आहेत. या फीचरच्या मदतीने यूजर्स आयफोन फोन कॉल रेकॉर्ड करू शकतील. आता तुम्ही विचाराल की हे फिचर प्रायव्हसीबद्दल चिंतेचे कारण ठरेल का? असे अजिबात नाही कारण जेव्हा कोणीतरी तुमचा फोन कॉल रेकॉर्ड करेल, तेव्हा तुम्हाला कळवले जाईल की तुमचा फोन कॉल रेकॉर्ड केला जात आहे. म्हणजे तुमच्या परवानगीशिवाय कोणीही फोन कॉल रेकॉर्ड करू शकणार नाही. तुम्हाला हे नोटीफिकेशन iOS 18 अपडेटमध्ये आपोआप मिळेल.
तुम्हाला कॉल रेकॉर्डचे मिळेल नोटीफिकेशन
ॲपलने एक इमेज शेअर केली आहे, ज्यामध्ये फोन ॲपचा रेकॉर्डिंग ऑप्शन दिसू शकतो, जो साउंडवेबसोबत दिसेल. तुम्हाला किती काळ रेकॉर्ड केले आहे हे देखील सांगितले जाईल.
कॉल ट्रांसक्रिप्ट देखील करता येईल
नवीन अपडेटमध्ये, आयफोन कॉल रेकॉर्ड केल्यानंतर, ते नोट ॲपमध्ये ट्रांसक्रिप्ट केले जाऊ शकते, जिथे तुम्ही नवीन Apple Intelligent AI सिस्टमच्या मदतीने समरी तयार करू शकाल. याशिवाय तुम्ही नोट ॲपवरून ऑडिओ ट्रान्स्क्राइब करू शकाल. तसेच रेकॉर्ड देखील त्यात करता येईल. जे ऑनलाइन किंवा फोन कॉलवर अभ्यास करतात त्यांच्यासाठी हे फिचर उपयुक्त ठरेल. शिवाय कॉलवर कोणतीही महत्वाची माहिती होत करायची असल्यास हे फिचर मदत करेल.
या भाषांमध्ये उपलब्ध असेल सपोर्ट
ऑडिओ ट्रान्सक्रिप्ट हे फिचर फक्त इंग्रजी, स्पॅनिश, जर्मन, फ्रेंच, जपानी, मंदारिन, चीनी, पोर्तुगीज आणि कँटोनीजमध्ये या भाषांमध्ये उपलब्ध असेल. ऑडिओ ट्रान्सक्रिप्ट फीचर व्यतिरिक्त, नवीन अपडेटमध्ये कस्टमाइज्ड होमपेज, कंट्रोल सेंटर सारखे फीचर्स दिले जातील.