पंतप्रधानांच्या शपथविधी सोहळ्यात दिसला हा AC; इतकी आहे किंमत, कुठेही होऊ शकतो फिट

नरेंद्र मोदींनी देशाचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली आहे. या सोहळ्याचे अनेक फोटोज आणि व्हिडीओज वायरल झाले आहेत, काहींना मागे बिबट्या दिसला होता तर काहींना मांजर. तसेच एक फोटो देखील सोशल मीडियावर वायरल होत आहे, ज्यात पीएम मोदी, गृह मंत्री अमित शाह आणि इतर मंत्र्यांच्या मागे एक एसी ठेवलेला दिसत आहे. हा पोर्टेबल टॉवर एसी आहे, तुम्हाला याविषयी माहिती नसेल तर चला जाणून घेऊया या कुठेही नेता येणाऱ्या एसी बाबत.

Tower AC

याच्या डिजाइनवरूनच या एसीला टॉवर एसी हे नाव देण्यात आले आहे. हा कुठेही सहज फिट करता येतो. याच्या मदतीनं तुम्हाला कुलिंग देखील खूप चांगली मिळते. हा एसी कुठेही सहज फिट करताना जास्त विचार करावा लागत नाही किंवा फिट करण्यासाठी कोणाची मदत घ्यावी लागत नाही म्हणून हा एसी जास्त लोकप्रिय आहे. विशेष म्हणजे हा एसी आउटडोर देखील फिट करता येतो आणि इंडोर पेक्षा चांगली कुलिंग मिळते.
मुकेश अंबानींच्या मुलीने आणले विंडो कुलर; इन्व्हर्टरवरही चालेल दिवसभर, जाणून घ्या किंमत

किती आहे किंमत

चला जाणून घेऊया हा एसी खरेदी करण्यासाठी तुम्हाला किती पैसे लागतात. टॉवर एसीची किंमत मॉडेल प्रमाणे बदल जाते म्हणून तुम्हाला 60 हजार ते 2 लाखांपर्यंतचा खर्च करावा लागू शकतो. ही किंमत कंपनी आणि एसीच्या मॉडेलवर अवलंबून असते, Voltas आणि Blue Star दोन अश्या कंपन्या आहेत ज्या टॉवर एसी बनवतात. यांची कुलिंग कपॅसिटी देखील चांगली आहे.

कुठे वापरता येईल टॉवर एसी

हा एसी मोठ्याप्रमाणात कॉरपोरेट आणि बिजनेस मीटिंग्ससाठी वापरला जातो. म्हणजे अश्या जागी याचा वापर जास्त केला जातो जिथे खूप कमी जागा असते. तसेच या एसीचा वापर सोहळ्यांमध्ये जास्त केला जातो. याचा एयर फ्लो देखील चांगला असतो त्यामुळे याला प्राधान्य दिले जाते. एयर फ्लो चांगला असल्यामुळे कुलिंग देखील चांगली मिळते. फिटिंगसाठी तुम्ही कंपनीची देखील मदत घेऊ शकता किंवा तुम्ही देखील हा कुठेही सहज फिट करू शकता.

Source link

blue starnaredra modioath ceremonytower acvoltasटॉवर एसीनरेंद्र मोदी
Comments (0)
Add Comment