Fact Check : पंतप्रधान मोदींचा त्यांच्या आईसोबत बालपणीचा फोटो व्हायरल? जाणून घ्या फोटोचं सत्य

नवी दिल्ली : सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये एक महिला आणि लहान मुलगा दिसत आहे. फोटोमधून असा दावा केला जात आहे, की व्हायरल होणारा फोटो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बालपणीचा फोटो आहे. या फोटोमध्ये त्यांच्यासोबत दिसत असलेली महिला त्यांची आई आहे, असा दावा करत फोटो सोशल मीडियावर व्हायरल केला जात आहे.

विश्वास न्यूजला आपल्या पडताळणीत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नावाने व्हायरल होणारा फोटो त्यांच्या बालपणीचा नसल्याचं आढळलं आहे.

व्हायरल फोटोत काय म्हटलंय?

फेसबुक युजर सुमन डान्सरने १० जून रोजी व्हायरल फोटो आपल्या अकाऊंटवर अपलोड केला आहे. फोटोवर लिहिलंय, की ‘पंतप्रधान मोदी आणि त्यांच्या आईचा सुंदर फोटो, कोणीही लाइक केल्याशिवाय जाऊ नका’. फोटो शेअर करत युजरने लिहिलंय, की ‘हिरोचे फोटो तर सर्वच लाइक करतात. आज पाहूया आपल्याला किती लोक लाइक करतात’.

पडताळणीत काय समोर आलं?

व्हायरल होणारा फोटो याआधीही चुकीच्या दाव्यासह व्हायरल झाला आहे. त्यावेळीही विश्वास न्यूजने त्याची पडताळणी केली होती. त्यावेळी या फोटोचं सत्य जाणून घेण्यासाठी विश्वास न्यूजने हा फोटो गुगल रिव्हर्स इमेज सर्च केला. इंटरनेटवर हा फोटो देशाचे माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांच्या दाव्यासह व्हायरल झाल्याचं आढळलं होतं.
Fact Check : पंतप्रधान मोदींच्या सन्मानार्थ नितीन गडकरी उभे राहिले नाहीत? व्हायरल व्हिडिओचं सत्य काय?
सर्च करताना व्हायरल फोटोचा संपूर्ण भाग मरियाला श्रीनिवास नावाच्या एका फेसबूक युजरच्या अकाऊंटवर मिळाला होता. खऱ्या फोटोमध्ये काही इतरही लोक दिसत आहेत. ३ मे २०२० रोजी मरियाला श्रीनिवास यांनी फोटो शेअर करुन सांगितलेलं, की हा फोटो त्यांचा कुटुंबाचा आहे. त्यांनी लिहिलेलं, की फोटोमध्ये त्यांच्या आईसोबत त्यांचा भाऊ आहे आणि त्यांच्या वडिलांसोबत त्यांची बहीण बसली आणि मधोमध मरियाला स्वत: आहेत.

विश्वास न्यूजने पडताळणीत पंतप्रधान मोदींच्या भावाशी संपर्क केला. त्यावेळी त्यांनी फोटोसह व्हायरल होणारा दावा चुकीचा असल्याचं सांगितलं.

निष्कर्ष

विश्वास न्यूजने आपल्या पडताळणीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या आईच्या नावाने सोशल मीडियावर व्हायरल होणारा फोटो पंतप्रधान मोदींचा नसून तो फोटो एक फेसबुक यूजर मरियाला श्रीनिवास यांच्या कुटुंबाचा आहे.

(This story was originally published by Vishvas News, and republished by MT as part of the Shakti Collective.)

Source link

fact check newsfact check pm modi childhood photo viralpm modi childhood photo viralफॅक्ट चेकफॅक्ट चेक पंतप्रधान मोदी गाणी व्हिडिओ
Comments (0)
Add Comment