Facebook Data Leak: फेसबुक यूजर्सवर नवे संकट, पुन्हा एकदा लाखो लोकांचा महत्त्वाचा डेटा लीक

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुकवरील लाखो युजर्सची सिक्योरिटी धोक्यात आली आहे, अलीकडेच, सायबर सिक्योरिटी रिसर्चर्स डेटा बाबत माहिती देताना सांगितले की, 1 लाख युजर्सचा डेटा लीक झाला आहे. फेसबुक डेटा लीकची बातमी येण्याची ही पहिलीच वेळ नाही, याआधीही अशा बातम्या अनेकदा समोर आल्या आहेत.

नवी दिल्ली येथील सायबरपीस या संस्थेच्या टीमने याचा शोध लावला आहे. सायबरपीसच्या मते, लीक झालेल्या डेटामध्ये फेसबुक युजर्सची काही महत्त्वाची माहिती लीक झाली आहे, ज्यामध्ये त्यांचे पूर्ण नाव, ईमेल, प्रोफाइल डिटेल्स, युजर्सचे लोकेशन आणि त्यांचे फोन नंबर यांचा समावेश आहे. डेटा लीक होण्यासोबतच ज्या यूजर्सचा डेटा लीक झाला आहे त्यांच्यावर फिशिंग हल्ला होण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे.

फेसबुकचा डेटा कोणी चोरला हे सध्या तरी कळू शकलेले नाही. सायबरपीसचे म्हणणे आहे की, या प्रकरणी फेसबुक किंवा फेसबुकची मूळ कंपनी मेटा यांच्याकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

वारंवार डेटा लीक होणे चिंतेचा विषय

सायबरपीस कंपनीचे म्हणणे आहे की डेटा लीक होण्यामागे हॅक्टिव्हिस्ट, सायबरक्रिमिनल ग्रुप किंवा मॅलिशस एंटिटी यांचा सहभाग आहे का हे शोधण्यासाठी डेटा ब्रीचचा तपास केला जात आहे. फेसबुकचा डेटा ज्या प्रकारे लीक होत आहे तो चिंतेचा विषय असल्याचे संशोधकांचे म्हणणे आहे. डेटा सुरक्षेचा भंग झाल्यामुळे कंपनीच्या प्रतिमेवर परिणाम होत आहे.

फेसबुकची प्रायव्हसी कशी मजबूत करावी?

तुमच्या Facebook अकाऊंटची प्रायव्हसी मजबूत करण्यासाठी तुम्ही सेटिंग्जमध्ये देण्यात आलेला टू स्टेप्स व्हेरीफिकेशन हा ऑप्शन वापरू शकता. याशिवाय, तुमची प्रोफाइल, पोस्ट कोण पाहू शकते आणि तुम्हाला पोस्टमध्ये कोण टॅग करू शकते याबद्दल तुमच्या प्रोफाइलमधील सेटिंग्ज अपडेट करा.

तुमच्या Facebook अकाऊंटसाठी एक मजबूत पासवर्ड तयार करा ज्यामध्ये अक्षरे, संख्या आणि चिन्हे इ. याशिवाय फेसबुकवर तुमची प्रायव्हसी सेटिंग्ज चेक करा आणि त्यानुसार सेटिंग्ज अपडेट करा.

Source link

Facebook Data Leakडेटा बाबतडेटा लीकफेसबुकशोध लावलासायबर सिक्योरिटीसिक्योरिटी धोक्यात
Comments (0)
Add Comment