Andhra Pradesh:आंध्र प्रदेशात निवडणुकीनंतर राड्याला सुरुवात; चाकू, कुऱ्हाडीने केलेल्या हल्ल्यात टीडीपी नेत्याचा मृत्यू

अमरावती : चंद्राबाबू नायडू यांच्या तेलगू देसम पक्षाचे (टीडीपी) नेते गौरीनाथ चौधरी यांच्यावर चाकू आणि कुऱ्हाडीने हल्ला झाल्याची घटना घडली आहे. आंध्रप्रदेशमधील कर्नूल जिल्ह्याच्या बोम्मिरेड्डीपल्ले या गावात हा हल्ला झाला असून त्यात गौरीनाथ चौधरी यांचा मृत्यू झाला. टीडीपीचा विरोधी पक्ष वायएसआरसीपीच्या कार्यकर्त्यांनी हा हल्ला केला असल्याचा आरोप टीडीपीने केला आहे. या घटनेमुळे आजूबाजूच्या परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

पोलिसांकडून हाय अलर्ट

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना बोम्मिरेड्डीपल्ले गावात घडली. गौरीनाथ चौधरी हे या भागातील टीडीपीचे प्रमुख नेते होते. चौधरी यांच्यावर हल्ला करणाऱ्यांचे नेतृत्व वायएसआरसीपी कार्यकर्ते पमय्या, रामकृष्ण यांच्यासह इतर लोकांनी केले असा आरोप टीडीपीने केला आहे.चौधरी यांच्या हत्येमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण असून स्थानिक लोक घाबरले आहेत. त्यामुळे घटनास्थळी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी सुरक्षा दल तैनात केले असून हाय अलर्ट जारी केला आहे.
Shocking News: अंत्यसंस्कार झाले, तेराव्याची तयारी सुरु; तितक्यात ‘मृत’ लेक घरी जिवंत परतला अन् मग…

जगन मोहन रेड्डी हल्ल्याचे सूत्रधार असल्याचा टीडीपीचा आरोप

टीडीपी प्रमुख चंद्राबाबू नायडू यांचा मुलगा नारा लोकेश यांनी या हल्ल्याचा निषेध केला आहे. तसेच माजी मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी हे या हत्येचा कटात सामील असल्याचा आरोप नारा लोकेश यांनी केला आहे.

या प्रकरणासंदर्भात त्यांनी ‘एक्स’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर जगन मोहन रेड्डी यांच्या विरोधात एक पोस्ट लिहिली आहे त्यात ते म्हणाले की, ” वायएस जगन मोहन रेड्डी हे निवडणूक हरले आहेत. तरीही त्यांनी आपला रक्तरंजित इतिहास लिहिणे सुरूच ठेवले. त्यांच्या सांगण्यावरून कर्नूल जिल्ह्यातील टीडीपी नेते गौरीनाथ चौधरी यांची निर्घृण हत्या करण्यात आली. जगन मोहन रेड्डी यांनी हत्येचे राजकारण थांबवावे अन्यथा त्याचे परिणाम गंभीर होतील.” असा इशारा नारा लोकेश यांनी दिला.

आम्ही हल्ल्याची चौकशी करू

नारा लोकेश यांनी पुढे लिहिले की, “गौरीनाथ चौधरी यांच्या कुटुंबाला टीडीपीचा पाठिंबा आहे.वायएसआरसीपीच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या हल्ल्यांची आम्ही चौकशी करू”.

दरम्यान, २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसोबतच आंध्रप्रदेश विधानसभेचीही निवडणुक झाली. या निवडणुकीत वायएसआरसीपीला बहुमत मिळालं नाही. टीडीपीने १७५ पैकी १३५ जागा जिंकून बहुमत मिळवत सरकार स्थापन केले आहे. टीडीपीच्या मित्रपक्षांपैकी भाजपला ८ तर जनसेना पक्षाला २१ जागा मिळाल्या आहेत. आता या हत्येमुळे नायडू आणि रेड्डी यांच्या वैरामध्ये आणखी वाढ झाल्याची पाहायला मिळत आहे.

Source link

Amravati TOPICAndhra Pradesh election violencechandrababu naiduGauri Nath Chaudhary deathjagan mohan reddyTDP leader murderYSRCP vs TDPआंध्रप्रदेश न्यूज
Comments (0)
Add Comment