जिल्ह्यातील बिसांडा पोलिस स्टेशन हद्दीतील बिलगाव येथील इंद्रबाबू गुप्ता यांचा मुलगा पारस गुप्ता उर्फ माताप्रसाद (२२) याने रविवारी सायंकाळी खोलीतील पंख्याच्या हुकला गळफास घेऊन आत्महत्या केली. बराच वेळ होऊनही पारस खोलीतून बाहेर न आल्याने त्याचा मुलगा त्याला बोलावायला गेला. तेव्हा त्याला त्याचे वडील गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आले. हे पाहताच त्याने आरडाओरड केली. आवाज ऐकून कुटुंबातील इतर सदस्य घटनास्थळी पोहोचले. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून दरवाजा तोडून मृतदेह बाहेर काढला. पोलिसांना त्याच्याकडून पाच पानी सुसाईड नोट सापडली आहे
पारसचा लहान भाऊ विष्णू गुप्ता यांनी सांगितले की, पारसचे जवळच्या नात्यातील महिलेसोबत गेल्या तीन महिन्यांपासून प्रेमसंबंध होते. सुसाईड नोटमध्ये त्याने लिहिलं आहे की, तुझं माझ्यावर प्रेम आहे तर जीव देऊन दाखव, मग तुझं माझ्यावर प्रेम आहे असं मी समजेन, असं महिलेने म्हटलं होतं. महिलेच्या सांगण्यावरून मी आत्महत्या करत आहे. ज्या महिलेसाठी मी जीव देतो आहे, त्या महिलेला सोडू नका, असं त्याने पोलिसांना उद्देशून लिहिलं आहे, तसेच, आई आणि भावाची माफी मागितली.
पारसचे ९ वर्षांपूर्वी लग्न झाले होते. त्याच्या निधनानंतर पत्नी कलावती आणि आई गीता यांनी एकच आक्रोश केला. त्याचे, वडील इंद्र बाबू यांचा दोन वर्षांपूर्वी अपघाती मृत्यू झाल्याची माहिती आहे.
बिसांडा पोलिस ठाण्याचे प्रभारी श्याम बाबू शुक्ला यांनी सांगितले की, प्रथमदर्शनी हे आत्महत्येचे प्रकरण आहे. मृताकडून एक सुसाईड नोटही जप्त करण्यात आली आहे. ज्यामध्ये एका महिलेला आत्महत्येसाठी जबाबदार धरण्यात आले आहे. पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत