चौहान इच्छुक, पण मोदी-शहांना नकोत; खट्टर मोदींना हवेत, पण संघाचा विरोध; भाजप अध्यक्षपदी कोण?

नवी दिल्ली: भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा यांच्या नावाचा समावेश केंद्रीय मंत्रिमंडळात झाल्यानं पक्षाचं अध्यक्षपद कोणाकडे जाणार याची चर्चा सुरु आहे. नड्डा यांचा अध्यक्षपदाचा कार्यकाळ पूर्ण झालेला आहे. त्यामुळे त्यांच्या जागी कोणाची नियुक्ती होणार याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे. नवा अध्यक्ष निवडण्याची जबाबदारी भाजपच्या नेत्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडे सोपवली आहे.

मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान, हरयाणाचे माजी मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर, भूपेंद्र यादव, धर्मेंद्र प्रधान, सी. आर. पाटील यांची नाव चर्चेत आहे. पण या सगळ्यांचा समावेश मंत्रिमंडळात झाल्यानं त्यांची नावं अध्यक्षपदाच्या शर्यतीतून बाहेर पडली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहांनी भाजपचा अध्यक्ष निवडण्याची जबाबदारी संघावर सोडली आहे. त्यामुळे भाजपचे पुढील अध्यक्ष संघनिष्ठ असतील हे स्पष्ट झालं आहे.
Daggubati Purandeswari: भाजप एका दगडात मारणार दोन पक्षी? मित्रपक्षाला शह? दक्षिणेच्या ‘सुषमा स्वराज’ अचानक चर्चेत
सध्याच्या घडीला भाजप अध्यक्ष पदासाठी राष्ट्रीय सरचिटणीस सुनील बन्सल, विनोद तावडे आणि माजी केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांची नावं चर्चेत आहेत. पण ऐनवेळी अशा नेत्याचं नाव समोर येईल, ज्याची कल्पना कोणीही केलेली नसेल, असं संघाच्या एका नेत्यानं खासगीत सांगितलं. २००९ मध्ये अशाच प्रकारे नितीन गडकरींची निवड झालेली होती. तेव्हा अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. आताही तसाच प्रकार घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

संघावर का जबाबदारी?
भाजप अध्यक्षपदासाठी सी. आर. पाटील यांचं नाव सर्वात योग्य मानलं जात होतं. त्यांनी गुजरात भाजपची जबाबदारी उत्तमपणे हाताळली आहे. पण पंतप्रधान आणि गृहमंत्री गुजरातचे असताना त्याच राज्याचा पक्षाध्यक्ष नको म्हणून पाटलांचं नाव मागे पडलं. त्याचमुळे त्यांना मंत्री करण्यात आलं. शिवराज सिंह चौहान अध्यक्ष होण्यास इच्छुक होते. पण मोदी, शहांचा त्यांच्या नावाला विरोध होता. मनोहरलाल खट्टर यांच्या नावाला मोदींची संमती होती. पण संघाला ते नको होते. त्यामुळे अध्यक्षपदाचा चेहरा निवडण्याची जबाबदारी भाजपनं संघाकडेच सोपवली.

Source link

Anurag Thakurbjp presidentRSSsunil bansalvinod tawdeअनुराग ठाकूरआरएसएसभाजप अध्यक्षविनोद तावडेसुनील बन्सल
Comments (0)
Add Comment