अखेर शिवसेनेचं ‘अवजड’ नातं संपुष्टात; पण ७ खासदार असलेल्या शिंदेंवर नामुष्की, स्वामींची बाजी

नवी दिल्ली: सलग तिसऱ्यांदा सत्तेवर आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंत्रिमंडळ वाटपात महत्त्वाचे विभाग भारतीय जनता पक्षाकडेच ठेवले. गृह, संरक्षण, अर्थ, रेल्वे, रस्ते वाहतूक, परराष्ट्र मंत्रालय ही महत्त्वाची खाती भाजपच्या मंत्र्यांकडेच देण्यात आली आहेत. विशेष म्हणजे गेल्या टर्ममध्ये ज्या मंत्र्यांनी या खात्यांचा कारभार पाहिला, त्यांच्याकडेच मोदींनी पुन्हा या विभागांची धुरा दिलेली आहे. किंगमेकर ठरलेल्या तेलुगू देसम पक्ष आणि संयुक्त जनता दलाला प्रत्येकी दोन मंत्रिपदं देण्यात आलेली आहेत.

भाजपचा जुना मित्र असलेल्या, लोकसभेत ७ खासदार असलेल्या शिंदेसेनेची केवळ एका मंत्रिपदावर बोळवण करण्यात आलेली आहे. विशेष म्हणजे शिंदेसेनेला कॅबिनेट मंत्रिपद देण्यात आलेलं नाही. त्यांच्या वाट्याला राज्यमंत्रिपद आलेलं आहे. शिंदेसेनेचे खासदार प्रतापराव जाधव यांच्याकडे आयुष मंत्रालयाचं राज्यमंत्रिपद देण्यात आलेलं आहे. याशिवाय आरोग्य मंत्रालयाचं राज्यमंत्रिपदही त्यांच्याकडे सोपवण्यात आलं आहे.
लोकसभेची पहिली टर्म, काल मंत्रिपदाची शपथ अन् आज भाजपचा मंत्री म्हणतोय, मला मोकळं करा! पण का?
मोदींच्या तिसऱ्या टर्ममध्ये अवजड उद्योग मंत्रालय कर्नाटककडे गेलं आहे. जेडीएसचे कुमारस्वामी या मंत्रालयाची धुरा सांभाळतील. विशेष म्हणजे अवघ्या २ खासदार असलेल्या जेडीएसला केंद्रात कॅबिनेट मंत्रालय मिळालं आहे. सात खासदार असूनही एकनाथ शिंदेंना राज्यमंत्रिपद मिळत असताना कुमारस्वामी यांनी मुत्सद्देगिरी दाखवत कॅबिनेट मंत्रिपद पदरात पाडून घेतलं आहे.
नड्डा झाले मंत्री, आता भाजपची धुरा मराठी नेत्याच्या हाती? ‘टास्कमास्टर’ची अध्यक्षपदी वर्णी?
अवजड उद्योग खात्याची जबाबदारी जेडीएसकडे गेल्यानं या खात्यासोबत असलेलं शिवसेनेचं नातं संपुष्टात आलं आहे. गेल्या अनेक वर्षांपासून अवजड उद्योग मंत्रालय शिवसेनेकडे होतं. वाजपेयी आणि मोदींच्या दोन टर्ममध्ये हे मंत्रालय शिवसेनेकडे राहिलं. मनोहर जोशी, सुरेश प्रभू, बाळासाहेब विखे पाटील, सुबोध मोहिते यांनी वाजपेयींच्या मंत्रिमंडळात ‘अवजड’ जबाबदारी पाडली.

२०१४ मध्ये नरेंद्र मोदी सत्तेत आल्यानंतर अनंत गीते, अरविंद सावंत यांनी शिवसेनेकडून अवजड उद्योग मंत्रिपदाचा कार्यभार पेलला. शिवसेनेनं भाजपची साथ सोडल्यानंतर या खात्याची जबाबदारी भाजपच्या प्रकाश जावडेकर यांच्याकडे आली. मग हे खातं महेंद्र नाथ पांडेंकडे आलं. आता या खात्याची जबाबदारी कुमारस्वामी यांच्याकडे गेली आहे. त्यामुळे शिवसेना आणि अवजड उद्योगाच्या नात्याला ब्रेक लागला आहे.

Source link

Eknath Shindenda governmentprataprao jadhavshiv senaएकनाथ शिंदेप्रतापराज जाधवशिवसेना
Comments (0)
Add Comment