HMD 105 कंपनीनं ब्लॅक, पर्पल आणि ब्लू या तीन कलर ऑप्शनमध्ये लाँच केला आहे. तसेच, HMD 110 ब्लॅक आणि ग्रीन कलरमध्ये येतो. हे फोन सेलसाठी उपलब्ध करण्यात आले आहेत. हे तुम्ही सर्व रिटेल स्टोर्स ई-कॉमर्स साइट आणि कंपनीच्या ऑफिशियल वेबसाइटवरून विकत घेऊ शकता. चला जाणून घेऊया कंपनीच्या सर्वात पहिल्या फीचर फोन्सची वैशिष्ट्ये.
फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
कंपनीचे नवीन फोन प्रीमियम डिजाइन आणि मजबूत एजसह सादर करण्यात आले आहेत. यांचा कर्व्ह लुक आणि टेक्सचर असलेला बॅक पॅनल शानदार वाटतो. कंपनीनं यांच्या डिजाइनवर खास लक्ष दिलं आहे. त्यामुळे त्यामुळे हे हातात घेतल्यावर खूप कंफर्टेबल वाटतात. फोनमध्ये फीचर फोन्सच्या दृष्टेईने अनेक लेटेस्ट फीचर देण्यात आले आहेत. यात तुम्हाला फोन टॉकर, ऑटो कॉल रेकॉर्डिंग, MP3 प्लेयर, वायर्ड आणि वायरलेस FM रेडियो सारखे फीचर मिळतील.
HMD 105 मध्ये कंपनी ड्युअल एलईडी फ्लॅश आणि HMD 110 मध्ये प्रीमियम कॅमेरा डिजाइन देण्यात आली आहे. दोन्ही फोन 1000mAh च्या बॅटरसह बाजारात आले आहेत. कंपनीचा दावा आहे की ही बॅटरी 18 दिवसांपर्यंतचा स्टॅन्डबाय टाइम देते. कंपनीच्या नवीन फोनमध्ये 9 स्थानिक भाषांचा सपोर्ट देखील देण्यात आला आहे. विशेष म्हणजे कंपनी या फोन्सवर एक वर्षाची रिप्लेसमेंट गॅरंटी देखील देत आहे.