Samudrik Shastra: शरीराच्या या 6 अवयवांवर तीळ म्हणजे अशुभ परिणाम! नोकरी, व्यवसाय आणि लव्ह लाइफमध्ये समस्या!

Samudrika Shastra:

समुद्र शास्त्रात शरीरावर तीळ असण्याच्या शुभ आणि अशुभ प्रभावांबद्दल लिहिलेले आहे. काही तीळ व्यक्तीसाठी लाभदायक असतात, तर काही तीळ शुभ मानले जात नाहीत. समुद्रशास्त्रानुसार काही तीळ व्यक्तीच्या शरीरावर शुभ फल देणारे मानले जात नाहीत, हे तीळ नकारात्मक संकेत देत असतात. तर जाणून घेऊ शरीरावर अशुभ फलदायी तीळ.

1. करंगळीवर तीळ असण्याचा अशुभ परिणाम

ज्या व्यक्तीच्या करंगळीवर तीळ असते, त्यांना पैसा फार मिळतो, पण त्यांच्या जीवनात दुःख फार असते. अशा लोकांना जीवनात सतत कोणत्या ना कोणत्या संघर्षाला तोंड द्यावे लागते.

2. डाव्या बाहूवरील तिळाचा अशुभ प्रभाव

डाव्या बाहूवर तीळ असण्याचा अर्थ असा की ही व्यक्ती फार रागीट आहे. याला राग सहज येतो आणि असे लोक समोरच्या व्यक्तींना नेहमी पडताळत असतात.

3. ओठांवर तीळ असण्याचा अशुभ प्रभाव

ओठांवर तीळ असेल तर ही बाब असे दर्शवते की ही व्यक्ती जास्त कामुक आहे. सोबत ओठांवर तीळ असणे या गोष्टीकडे संकेत करतात की या व्यक्तीची आर्थिक स्थिती दोलायमान आहे, म्हणजेच या व्यक्तीची आर्थिक स्थिती अस्थिर आहे.

4. कानावर तीळ असण्याचा अशुभ प्रभाव

कानावर तीळ असणे शुभ मानले जात नाही. कानावर तीळ असणे संबंधित व्यक्ती अल्पायुषी असल्याचे निर्देश करते. अशा व्यक्तींना प्रकृतीशी संबंधित समस्यांचा सामना करावा लागतो.

5. डोळ्यावर तीळ असण्याचा अशुभ प्रभाव

ज्या लोकांच्या डोळ्याच्या डाव्या बाजूला तीळ असते, त्याला शुभ मानले जात नाही. अशा व्यक्तींच्या वैवाहिक जीवनात अडचणी येऊ शकतात. नवराबायकोत मतभेद निर्माण होऊ शकतात.

6. अनामिकेवर तीळ असण्याचा अशुभ प्रभाव

अनामिकेवर तीळ असणे शुभ मानले जात नाही. अनामिकेवर तीळ असलेल्या व्यक्तींना डोळ्याशी संबंधित आजारांचा सामना करावा लागतो. अशा व्यक्तींवर खोटे आरोप लागू शकतात, तसेच या व्यक्तीच्या मानसन्मानवर संकट असते.

टीप : ही सर्व माहिती भाविकांची श्रद्धा लक्षात घेऊन दिली जात आहे, तुमच्या श्रद्धा आणि विश्वासावर ज्योतिष उपाय आणि सल्ला वापरून पाहा. याचा उद्देश फक्त तुम्हाला चांगला सल्ला देणे आहे. या संदर्भात आम्ही कोणताही दावा करत नाही.

Source link

Moles On Your Bodysamudrika shastraUnlucky Moles on Bodyअशुभ परिणामओठावर तीळडोळ्यावर तीळतीळाचा अशुभ प्रभावतीळाचे महत्त्वशरीरावरील तीळ
Comments (0)
Add Comment