HMD Skyline डिजाइन
एक्स युजर्स HMD_MEME’S (@smashx_60) ने शेयर केलेल्या लीक रेंडर मध्ये HMD स्कायलाइन बॉक्सी डिजाइनसह पिवळ्या रंगात दाखवण्यात आला आहे. या फोनमध्ये जाड बेजल्स आणि टोकदार कोपरे दिसत आहेत. ज्यामुळे नोकिया लुमिया 920 ची आठवण ताजी होते. लीक झालेल्या इमेज हँडसेटवर एक पंच होल डिस्प्ले आणि इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर दिसत आहे.
HMD Skyline
रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे की HMD स्कायलाइनमध्ये 120Hz रिफ्रेश रेटसह फुल-एचडी+ OLED स्क्रीन असण्याची शक्यता आहे. हा क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 7s Gen 2 चिपसेटसह येऊ शकतो आणि 33W फास्ट चार्जिंग सपोर्टसह यात 4,900mAh ची बॅटरी दिली जाऊ शकते. हँडसेटमध्ये धूळ आणि पाण्यापासून सुरक्षा देण्यासाठी IP67 रेटिंग देखील असू शकते. कॅमेरा पाहता फोनमध्ये अल्ट्रा-वाइड लेन्ससह मॅक्रो किंवा डेप्थ सेन्सरसह 108-मेगापिक्सलचा मुख्य रियर कॅमेरा मिळू शकतो. मीडिया रिपोर्टनुसार HMD स्कायलाइन यावर्षी जुलैमध्ये 8GB रॅम व 256GB स्टोरेजसह लाँच होईल. या हँडसेटची किंमत EUR 520 (जवळपास 46,800 रुपये) असू शकते.
HMD Atlas
HMD लवकरच अॅटलस नावाचा आणखी एक फोन देखील लाँच केला जाऊ शकतो. HMD_MEME’S (@smashx_60) पोस्टनुसार, 8GB रॅम व 128GB स्टोरेज ऑप्शनसाठी $239.99 (जवळपास 20,000 रुपये) मोजावे लागू शकतात. फोनमध्ये 6.64-इंचाचा 120Hz फुल-एचडी+ डिस्प्ले, स्नॅपड्रॅगन 4 जेन 2 चिपसेट आणि क्विक चार्ज 4.0 सपोर्टसह 5,500mAh ची बॅटरी मिळू शकते. कॅमेरा पाहता एचएमडी अॅटलसमध्ये 5-मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड शूटर आणि एक डेप्थ सेन्सरसह 48-मेगापिक्सलचा प्रायमरी रियर सेन्सर मिळू शकतो. सेंटर होल-पंचमध्ये 16-मेगापिक्सलचा सेन्सर असण्याची शक्यता आहे.