विकेंडला खरेदी केल्यास होईल नुकसान
तुम्ही पाहिले असेल की बहुतेक लोक वीकेंडला ऑनलाइन वेबसाइट वापरून शॉपिंग करतात कारण त्यांच्याकडे आठवड्याभरात वेळ नसतो म्हणून यावेळेत लोक सर्वाधिक शॉपिंग करतात. यामुळे काय होते वस्तूंची मागणी वाढते आणि स्टॉक देखील संपतो. या कारणामुळे प्रोडक्ट्सच्या किमती सतत वाढत राहतात.
जेव्हा हजारो लोक एकाच वेळी वेबसाइटवर खरेदी करत असतात, तेव्हा प्रोडक्ट्सच्या किमती आणखी महाग दिसू लागतात व उपलब्ध असलेल्या ऑफर्स देखील बंद होतात. यामुळे किमतीपेक्षाही महाग खरेदी करावी लागते.
खरेदी करताना तुम्हाला कोणत्या दिवशी जास्तीत जास्त सूट मिळू शकते?
जर तुम्ही शनिवार आणि रविवारी खरेदी करत असाल, तर लक्षात ठेवा की सूट मिळण्याची शक्यता फक्त 10 ते 5% आहे, तर तुम्ही सोमवार आणि मंगळवार दरम्यान खरेदी केल्यास, त्या वेळी वेबसाइटवर सर्वात कमी ट्रॅफीक असते कारण लोक व्यस्त असतात त्यांच्या कामात. जर तुम्ही सोमवार ते मंगळवार सकाळी 6:00 ते संध्याकाळी 6:00 पर्यंत खरेदी केली तर तुम्हाला या काळात जास्तीत जास्त ऑफर्स मिळतात. कारण त्यामागील कारण असे आहे की या काळात फक्त निवडक लोक मोकळे राहतात आणि कमी लोक ऍक्टीव्ह असतात. असे केल्यास वेबसाईटसवर चांगली सूट मिळू शकते.