हायलाइट्स:
- अँटॉप हिल येथे सापडला मृतदेह
- शिर नसलेला मृतदेह सापडल्याने खळबळ
- गुन्हे शाखेने लावला प्रकरणाचा छडा
मुंबईःअँटॉप हिल परिसरात शिर नसलेला मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली होती. अखेर मुंबई गुन्हे शाखेनं या मृतदेहाचं गुढ सोडवलं आहे. या प्रकरणी गुन्हे शाखेनं दोन जणांना अटक केली आहे. (Mumbai crime news)
गुन्हे शाखेच्या युनिट ४ नं या प्रकरणाचा छडा लावला आहे. अँटॉप हिल परिसरातील सहायक पोलिस आयुक्त कार्यालयाच्या पाठीमागे सेक्टर ७ मधील मोकळ्या जागेत सकाळी रक्ताचे डाग लागलेली एक प्लास्टिक पिशवी होती. हात आणि पाय कापून मृतदेह प्लास्टिकच्या पिशवीत बांधून फेकण्यात आला होता. एकही पुरावा मागे न ठेवल्यामुळं गुन्हेगारांना शोधणं पोलिसांसमोर मोठं आव्हान होतं. मात्र, पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावला आहे.
वाचाः महाविकास आघाडीनं पुकारलेल्या ‘महाराष्ट्र बंद’ला मुंबईच्या डबेवाल्यांचा पाठिंबा
पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास केल्यानंतर या प्रकरणी एसपीचा पोलीस वाहनावरील चालक आणि त्याची पत्नी या दोघांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेला हा आरोपी मुंबई पोलिसांच्या वाहतूक विभागात पोलीस शिपाई आहे. मात्र, ही हत्या का करण्यात आली याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाहीये. गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी या दोघांना शनिवारी अटक केली होती.
वाचाः मुख्यमंत्री-राणे वाकयुद्धात नीलेश राणेंची उडी..
काय आहे प्रकरण?
अँटॉप हिल परिसरात गुरुवारी सकाळी शिर नसलेला मृतदेह सापडला होता. हात आणि पाय कापून मृतदेह प्लास्टिकच्या पिशवीत बांधून फेकण्यात आला असून तो जाळण्याचाही प्रयत्न झाला असल्याचा संशयही व्यक्त करण्यात येत होता. त्यामुळं एकच खळबळ माजली होती.
मुंबई महापालिका दक्ष! ३१ ऑक्टोबरपर्यंत ठेवणार काटेकोर लक्ष