Pakistan Hindu Temples : पाकिस्तानमध्ये ‘हिंदुत्व’ धोक्यात, जुन्या हिंदू मंदिरांचे मशिदीत रूपांतर, व्हिडिओ होतोय व्हायरल

नवी दिल्ली : पाकव्याप्त पंजाब प्रांतामध्ये असणाऱ्या एका हिंदू मंदिराचे मशिदीमध्ये रूपांतर करण्यात आले आहे. तसेच या मंदिराचा व्हिडिओ पाकिस्तानच्याच एका व्लॉगरने शेअर केला आहे. दरम्यान, पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात पूर्वी हिंदू आणि शीखांची मोठी लोकसंख्या होती, परंतु आज हे दोन्ही समुदाय अल्पसंख्यांक झाले आहेत. पाकिस्तानामध्ये अल्पसंख्याक असणे म्हणजे कट्टरवाद्यांच्या भीतीने जगणे हे आपल्याला सर्वांनाच ठाऊकच आहे. परंतु आज परिस्थिती अशी आहे की पाकिस्तानमध्ये राहणाऱ्या हिंदू आणि शीख धर्मीयांची धार्मिक स्थळे ताब्यात घेऊन त्यांचे मशिदीत रूपांतर केले जात आहे.

पाकिस्तानमधील अशाच एका हिंदू मंदिराची गोष्ट आपण जाणून घेणार आहोत. सनातन धर्म मंदिर असे या मंदिराचे नाव असून ते सरगोधा या गावात आहे. त्याचे आता मशिदीमध्ये रूपांतर करण्यात आले आहे. या मंदिरात हिंदूंना प्रवेश दिला जात नाही.

व्हिडिओतून सत्य आले समोर

पाकिस्तानी व्लॉगर माखनराम जटपाल यांनी या मंदिरात जाऊन त्याचे मंदिरातील व्हिडिओ शूट केला असून सत्य जगासमोर आणले आहे. पाकिस्तानमध्ये हिंदूंवर कसा अत्याचार केला जातो? याची माहिती देखील व्हिडिओ मध्ये सांगण्यात आली आहे. मंदिराच्या भिंतींवर अजूनही हिंदू देवतांच्या पूजेचे मंत्र लिहिलेले आहेत. तसेच जटपाल यांनी शूट केलेल्या व्हिडिओमध्ये सुद्धा गायत्री मंत्र स्पष्टपणे दिसत आहे.
Shocking Crime: पोरामुळे माझ्या ४ नोकऱ्या गेल्या, घरात अन्नाचा कण नाही! लेकाला संपवून आई बॉडीशेजारीच बसली

पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात अनेक हिंदू मंदिरे

माखनराम जटपाल यांनी त्यांच्या व्लॉगमध्ये दिलेल्या माहितीनुसार पाकव्याप्त पंजाब प्रांतात अनेक हिंदू मंदिरे तसेच गुरुद्वारा आहेत. सनातन मंदिराच्या शेजारीच सच्चा सौदा नावाचा गुरुद्वारा होता. त्याचेही आता मशिदीत रूपांतर करण्यात आले आहे. आजही त्याच्या भिंतींवर लिहिलेली हिंदू धर्माची चिन्हे आणि मंत्र हे हिंदू मंदिरांची स्पष्टपणे साक्ष देत आहेत.

Source link

pakistan hindu templepakistan hinduspakistan newsपाकिस्तानपाकिस्तान बातमीमशीद वादहिंदू धर्महिंदू-मुस्लिम
Comments (0)
Add Comment