मोदीजी, मला तुमच्या टिममध्ये घ्या, जबाबदारी द्या! POKमधील कार्यकर्त्याची विनंती

लंडन: नरेंद्र मोदी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान झाले आहेत. मोदींनी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर पाकव्याप्त काश्मीरशी संबंध असणारे आणि लंडनमध्ये राहणारे कार्यकर्ते अमजद अयूब मिर्झा यांनी एक महत्त्वाची मागणी केली आहे. तुमच्या सरकारमध्ये मला काहीतरी जबाबदारी द्या, अशी मागणी त्यांनी केली आहे. मी भारतीयच आहे. त्यामुळे मलाही सरकारमध्ये स्थान देऊन देशसेवेची संधी द्या, असं आवाहन मिर्झा यांनी केलं आहे.

भाजपचा गमछा गळ्यात घालून मिर्झा यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यात त्यांनी मोदींचं कौतुक केलं. ‘नेहरुंनंतर तिसऱ्यांदा पंतप्रधान होण्याची कामगिरी मोदींनी करुन दाखवली. त्याबद्दल मी त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. नरेंद्र मोदीजी, एनडीएच्या बैठकीतलं आणि पंतप्रधान झाल्यानंतरच तुमचं भाषण मी पाहिलं. तुमचा जन्म आराम करण्यासाठी झाला नसल्याचं तुम्ही म्हटलं. ही बाब माझ्यासारखीच आहे. मी पण तुमच्याप्रमाणेच आहे. वेळ काळ न पाहता, दिवसरात्र काम करतो. त्यामुळे आपल्यातला हा गुण सारखाच आहे,’ असं मिर्झांनी म्हटलं आहे.
‘ती’ खुर्ची अतिशय महत्त्वाची, २५ वर्षांपूर्वी भाजपचा घात झालेला; मोदी पुन्हा रिस्क घेणार?
तुम्ही खचितच मोठे आणि महान आहात. एनडीएच्या बाहेरील माणसांचंही स्वागत करेन असं तुम्ही म्हटलंत. ही गोष्ट खूप चांगली आहे. माझा संबंध पाकव्याप्त काश्मीरसोबत आहे. मी लंडनमध्ये राहतो. पाकव्याप्त भारतामधील जनतादेखील भारतीय आहे. त्यामुळे भारतीय असल्याच्या नात्यातून मला तुमच्या टिमचा भाग व्हायचं आहे, अशी इच्छा मिर्झांनी व्यक्त केली.
चौहान इच्छुक, पण मोदी-शहांना नकोत; खट्टर मोदींना हवेत, पण संघाचा विरोध; भाजप अध्यक्षपदी कोण?
तुमच्या टिममध्ये काम करायचं असल्यास तीन गुण असायला हवेत असं तुम्ही म्हणालात. त्यातील पहिला गुण वैचारिक स्पष्टता. त्यात मी पूर्णपणे पात्र ठरतो. मी एक भारतीय आहे आणि पीओके भारताचा भाग आहे. मजबूत आत्मविश्वास असायला हवा असंही तुम्ही म्हटलंत. तुमच्या नेतृत्त्वात भारत पुढे जाणार याबद्दल मला विश्वास वाटतो. यंदा पीओकेचा विषय सुटेल आणि संपूर्ण काश्मीर भारताचा भाग बनेल असा विश्वास मला वाटतो, असं मिर्झा पुढे म्हणाले.

मोदींनी उल्लेख केलेला तिसरा महत्त्वाचा मुद्दा चारित्र्याचा होता. त्यासाठी माझी पार्श्वभूमी महत्त्वाची आहे. मी केलेली कामंच माझ्या चारित्र्याची खात्री देतात. या सगळ्या गोष्टींचा विचार करुन मोदींनी मला त्यांच्यासोबत काम करण्याची संधी द्यावी. तुम्ही संधी दिल्यास ते माझं सौभाग्य असेल, असं मिर्झा म्हणाले.

Source link

amjad ayub mirzaNarendra Modinda govtpokअमजद अयूब मिर्झाएनडीए सरकारनरेंद्र मोदीपीओके
Comments (0)
Add Comment