एनसीबीने ‘ते’ फुटेज जाहीर करावं; नवाब मलिकांचे थेट आव्हान

मुंबईः क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणी एनसीबीने केलेल्या कारवाईवरुन महाराष्ट्रात वातावरण तापलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी क्रूझ पार्टीवरील धाड बनावट असल्याचं म्हटलं होतं. तसंच, एनसीबी व भाजपवरही जोरदार निशाणा साधला होता. नवाब मलिक यांनी पुन्हा एकदा या प्रकरणी एनसीबीवर काही सवाल उपस्थित केले आहेत.

नवाब मलिक यांनी एनसीबीवर केलेल्या आरोपांवर एनसीबीने देखील पत्रकार परिषद घेतली होती. त्यावेळी एनसीबीने एकूण १४ लोकांना ताब्यात घेतलं असून ६ लोकांना सोडल्याची माहिती दिली. यावरुन नवाब मलिक यांनी एनसीबीला आव्हान दिलं आहे.

‘मी म्हणालो होतो ११ पैकी तिघांना सोडलं. एनसीबी सांगतंय ११ नाही, १४ लोकं होते. आम्ही सगळं फुटेज पाहिलं. तीन लोक सोडल्यानंतर हे फुटेज आम्ही जगासमोर आणलं आहे. मी एनसीबीला आव्हान करतो, की जर १४ लोकं होते, तर आणखीन तीन लोकं कोण होते ते त्यांनी जाहीर करावं. तुमच्या ऑफिसमधून ते लोकं बाहेर पडतानाचं फुटेज जाहीर करा. भाजपच्या नेत्यांनी सांगितल्यानंतर ३ लोकांना सोडलं आहे. ही सगळी कारवाई बनावट आहे,’ असं नवाब मलिक यांनी म्हटलं आहे.

वाचाः सावध राहा! स्वत:चं घर सांभाळा; नवाब मलिक यांचा नीतेश राणेंना सल्ला

‘एनसीबीचे दिल्लीतील अधिकारी सांगत होते की आम्ही जागेवर पंचनामा करतो. मी त्यांना विचारू इच्छितो की मागच्या रविवारी रात्री साडेआठ वाजता तुम्ही काही फोटो माध्यमांना पाठवले. चुकून एक व्हिडिओ तुमच्याकडून पाठवण्यात आला. त्यात स्पष्टपणे दिसतंय की जप्ती क्रूजवर किंवा टर्मिनसवर आलेलं नाही. हे फोटो समीर वानखेडेंच्या कार्यालयातले आहेत. मागचे पडदेही समीर वानखेडेंच्या कार्यालयातले आहेत,’ असा दावा देखील नवाब मलिक यांनी केला आहे.

वाचाः महाविकास आघाडीनं पुकारलेल्या ‘महाराष्ट्र बंद’ला मुंबईच्या डबेवाल्यांचा पाठिंबा

‘काही लोक मला १०० कोटींच्या नोटिसा पाठवणार आहेत. मी वाट पाहतोय त्या नोटिशीची. एवढी माझी ऐपत आहे. भाजपने माझी ब्रँड व्हॅल्यू १०० कोटी ठरवली यासाठी मी त्यांचे आभार मानतो. काल मोहित कंबोज म्हणाले नवाब मलिक भंगारवाला आहे. मला अभिमान आहे. माझे वडिल आणि मी देखील भंगारचा व्यवसाय केला. कायदेशीर व्यवसाय करणं याचा मला अभिमान आहे,’ असा टोला नवाब मलिक यांनी लगावला आहे.

वाचाः मुख्यमंत्री-राणे वाकयुद्धात नीलेश राणेंची उडी…

Source link

aryan khan drug case updatecruise rave party caseNawab Maliksameer wankhede latest newsआर्यन खाननवाब मलिकसमीर वानखेडे
Comments (0)
Add Comment