आयएसएसमध्ये आढळला धोकादायक जिवाणू
आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकामध्ये (ISS)शास्त्रज्ञांना एन्टरोबॅक्टर बुगांडेन्सिस नावाचा जीवाणू सापडला आहे, त्याचबरोबर तो आयएसएसच्या बंद वातावरणात राहून अधिक प्रभावी झाला असल्याचं सांगण्यात आले आहे. हा एक बहु-औषध प्रतिरोधक जिवाणू आहे, तर त्याची सुपरबग म्हणून ओळख आहे. हा जीवाणू मानवाच्या श्वसन प्रणालीला संक्रमित करतो. त्यामुळे आता नासाची चिंता वाढली असून सुनीता विल्यम्स यांच्यासह इतर सहकाऱ्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे.
आयएसएस समोर जिवाणूचे मोठे आव्हान
आयएसएसमध्ये आढळून आलेल्या जीवणूचे नासासमोर एक मोठे आव्हान उभे राहिले आहे. या जिवाणू्ंवर औषधांचा परिणाम होत नाही. त्याचबरोबर हे जीवाणू पृथ्वीवर आढळणाऱ्या जीवाणूंपेक्षा पूर्णपणे वेगळे आहेत.
आयएसएस मधील जीवन सोपे नाही
दरम्यान, या जिवाणू बद्दल कॅलिफोर्नियातील नासाच्या जेट प्रोपल्शन लॅबोरेटरीच्या अध्यक्षा डॉ.कस्तुरी व्यंकटेश्वर यांनी अधिकची माहिती दिली आहे. त्या म्हणाल्या की, ”शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार, आयएसएस मधील अंतराळवीरांचे जीवन सोपे नसते. त्यांना आरोग्याशी संबंधित अनेक समस्यांना सामोरे जावे लागते, ज्यामुळे त्यांची प्रतिकारशक्ती पृथ्वीच्या तुलनेत कमी होते. त्यामुळे तिथे आढळून आलेला विषाणू हा त्यांच्या जीवाला धोका निर्माण करू शकतो”.
दरम्यान, सुनीता विल्यम्स आणि त्यांचे सहकारी ६ जून रोजी नवीन बोईंग स्टारलाइनर अंतराळयानाने आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर(ISS)पोहोचले. सुनीता विल्यम्स आणि विल्मोर हे त्या स्थानकावर राहणाऱ्या सात लोकांसोबत एक आठवडा घालवतील. यावेळी ते अवकाशात विविध प्रकारचे वैज्ञानिक प्रयोग करणार आहेत.