Indian Died In Russia: रशियन सैन्यातील भारतीयाचा मृत्यू; पंजाबच्या तेजपालने युक्रेन युद्धभूमीवर गमावला जीव

वृत्तसंस्था, नवी दिल्ली : रशियाच्या सैन्यात दाखल झालेल्या भारतीय तरुणाचा मार्चमध्ये युक्रेन युद्धभूमीवर मृत्यू झाल्याचे दोन दिवसांपूर्वी उघडकीस आले. तेजपालसिंग (३०) असे या तरुणाचे नाव आहे. या आधीही रशियन सैन्यातील दोन भारतीयांना प्राण गमवावा लागला होता.

तेजपाल यांची पत्नी परमिंदर कौर यांनी याबाबत माहिती दिली. ‘दोन दिवसांपूर्वी तेजपालच्या मित्राने फोन करून त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले. युक्रेनच्या युद्धभूमीवर मार्च महिन्यात ही घटना घडली. मात्र, रशिया-युक्रेन यांच्यातील युद्धामुळे संपर्क साधण्यात अडचण आल्याचे सांगण्यात आले,’ असे कौर म्हणाल्या.

‘गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये तेजपालसिंग नोकरीच्या शोधार्थ थायलंडमध्ये गेला होता. तिथे काही दिवस थांबल्यानंतर तो मित्रांसोबत १२ जानेवारीला टूरिस्ट व्हिसावर रशियामध्ये गेला. तिथे तेजपाल रशियन सैन्यात भरती झाला होता. त्याचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले असले, तरी मृतदेहाबाबत काहीच माहिती देण्यात आलेली नाही,’ असे कौर यांनी सांगितले.

Shocking News: अंत्यसंस्कार झाले, तेराव्याची तयारी सुरु; तितक्यात ‘मृत’ लेक घरी जिवंत परतला अन् मग…
तेजपालचा मृतदेह रशियात आणण्यात आला, की अद्याप युक्रेनमध्येच आहे, याबद्दलही कल्पना नसल्याचे कौर यांनी म्हटले आहे. तेजपालच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यासाठी त्याचा मृतदेह भारतात आणण्याबाबत रशियन सैन्य आणि भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाकडे ई-मेलद्वारे संपर्क करण्यात आल्याचे कौर यांनी सांगितले.

रशियाच्या सैन्यात भरती झालेल्या दोन भारतीयांचा अलिकडेच रशिया-युक्रेन युद्धात मृत्यू झाल्याचे भारताने मंगळवारी जाहीर केले. त्यांचे पार्थिव लवकरच भारतात पाठवण्यासाठी मॉस्कोतील भारतीय दूतावासाने रशियाच्या संरक्षण मंत्रालयासह संबंधितांकडे पाठपुरावा सुरू केला असल्याचे भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले. मार्चमध्ये हैदराबाद येथील मोहम्मद असफान या रशियन सैन्यातील तरुणाचा युक्रेनमध्ये मृत्यू झाल्याचे भारताने जाहीर केले होते.

Source link

Indian Died In Russiaindian died in russia ukraine warrussia ukraine crisisrussia ukraine wartejpal singhtourist visa
Comments (0)
Add Comment