एका बाबूंचा शपथविधी, दुसरे बाबू गैरहजर; नितीश गेले कुणीकडे? किंगमेकरच्या अनुपस्थितीची चर्चा

नवी दिल्ली: बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार काल आंध्र प्रदेशात झालेल्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधी सोहळ्याला अनुपस्थित होते. चंद्राबाबू नायडूंनी काल मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्या सोहळ्याला नितीश बाबूंनी दांडी मारली. दोघे बाबू केंद्रातील सरकारमध्ये किंममेकर असताना त्यातील एक बाबू शपथविधी सोहळ्याला गैरहजर राहिल्यानं चर्चांना उधाण आलं. सत्ताधारी एनडीएमध्ये सगळं काही आलबेल नसल्याचं म्हणत बिहारमधील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या राष्ट्रीय जनता दल या घडमोडींवर भाष्य केलं.

नितीश कुमारांच्या गैरहजेरीची चर्चा सुरु असताना नितीश कुमारांनी काल म्हणजेच बुधवारी संध्याकाळी तेलुगू देसम पक्षाचे अध्यक्ष चंद्राबाबू नायडूंना फोन केल्याची माहिती समोर आली आहे. नितीश यांनी नायडूंचं अभिनंदन केलं. नायडूंनी त्यांचे आभार मानले. नायडूंच्या नेतृत्त्वात आंध्र प्रदेश प्रगती करेल, असा विश्वास नितीश कुमारांनी व्यक्त केला.
लोकसभेत भोपळा, भाजपच्या गोटात चिंता; उद्या मुंबईत चिंतन, ४६ जागांनी वाढवलं टेन्शन
केंद्रात नितीश आणि नायडूंच्या पक्षांची भूमिका महत्त्वाची आहे. नायडूंच्या टिडीपीचे १६, तर जेडीयूचे १२ खासदार आहेत. दोन्ही पक्षांमुळेच केंद्रात भाजप सत्तेवर आहे. जेडीयू आणि टिडीपीला केंद्रात प्रत्येकी दोन मंत्रिपदं देण्यात आली आहेत. नितीश कुमारांचा पक्ष याआधी इंडिया आघाडीत होता. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी पलटी मारली आणि एनडीएचा हात धरला. तर टिडीपीनं २०१८ मध्ये एनडीएमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतलेला होता.

आंध्र प्रदेशात नायडूंच्या टिडीपीला प्रचंड बहुमत मिळालं आहे. भाजप आणि पवन कल्याण यांच्या जनसेना पक्षासोबत युती तरत नायडूंनी विधानसभा निवडणूक लढवली. एनडीएला १७५ पैकी १६४ जागा मिळाल्या. नायडूंनी काल मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा उपस्थित होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आरपीआयचे अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवलेदेखील सोहळ्याला हजर होते.

Source link

andhra pradeshchandrababu naiduNDAnitish kumarआंध्र प्रदेशएनडीएचंद्राबाबू नायडूनितीश कुमार
Comments (0)
Add Comment