Bhagavad Gita Saar :
महाभारताचे युद्ध सुरु होण्यापूर्वी श्रीकृष्णाने अर्जुनाला दिलेला उपदेश म्हणजे श्रीमद् भगवद्गीता. हा महाभारतातील भीष्मपर्वाचा एक महत्त्वाचा भाग मानला जातो. गीतमध्ये १८ अध्याय आणि ७०० श्लोक आहेत.
या भगवद्गीतेत श्रीकृष्ण आणि अर्जुनाचा संवाद लिहिला आहे. या ग्रंथामुळे मनुष्याला मुक्तीचा मार्ग मिळत नाही तर माणूस नव्याने घडण्याचे कार्य होते. यामध्ये कर्म योगाचा संदेश देताना राष्ट्रीय उत्थनाच्या कार्याबाबत नवीन प्रेरणा देते.
गीतेच्या शिकवणीतून श्रीकृष्णाने मनुष्याला जीवन जगण्याचा योग्य मार्ग शिकवला आहे. कर्माद्वारे भगवंताकडे नेणारा मार्ग त्यांनी दाखविला आहे. ज्यामध्ये प्रत्येक व्यक्तीसाठी जीवन जागण्याची उत्तम सूत्रे आहेत.
कृष्ण सांगतात की, जर एखाद्या व्यक्तीने आपले मन शांत आणि स्थिर ठेवून प्रयत्न केले तर त्याला नक्कीच चांगले परिणाम मिळतील. जर तुम्हाला आयुष्यात प्रत्येक टप्प्यावर यशस्वी व्हायचे असेल तर भगवद्गीतेतील ५ गोष्टी कायम लक्षात ठेवा.
1. जीवनातील प्रत्येक संघर्षाला सामोरे जा
मानवी जीवनातील संसारिक सुख भगवंतालाही सुटले नाही. अशावेळी श्रीकृष्ण सांगतात की परिस्थितीपासून लांब जाण्याऐवजी त्यासमोर तितक्याच ताकदीने उभे राहाणे गरजेचे आहे. काम करणे हे मानवी जीवनातील पहिले आणि महत्त्वाचे कर्तव्य आहे. आपल्या कृतीतूनच या समस्यांवर मात करता येते.
2. आरोग्याची काळजी
श्रीकृष्ण सांगतात की, विजय मिळवण्यासाठी व्यक्तीने निरोगी असणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. शारीरिक शरीरासोबत मानसिक शांतता देखील जास्त गरजेची आहे. शरीर निरोगी असेल तर शक्ती मिळते आणि मन देखील प्रतिकूल परिस्थितीत तीव्रतेने काम करते. त्यामुळे माणसाला प्रत्येक क्षेत्रात यश मिळते.
3. बाहेरच्या जगाचे ज्ञानही महत्त्वाचे
श्रीकृष्ण म्हणतात की, मनुष्य जीव हा बाहेरच्या जगात वावरण्यापेक्षा त्याला पुस्तकी ज्ञान जास्त आवडते. परंतु, कोणत्याही गोष्टीत पुस्तकी ज्ञान योग्य ठरत नाही. माणसाने जीवनाच्या प्रत्येक पैलुतून काही ना काही शिकत राहायला हवे.
4. नात्याला वेळ द्या
श्रीकृष्ण म्हणतात की, नात्यात अनेकदा वाद विवाद होतात. त्यात बोलले जाणारे अपशब्द नेहमी नात्यात दूरावा तयार करतात. अशावेळी शाब्दिक वाद करण्यापेक्षा एकमेकांना समजून घ्या. नाते अधिक दृढ करण्यासाठी त्याला पुरेसा वेळ द्या
5. शांतता सर्वात मोठे शस्त्र
युद्ध करण्यापूर्वी श्रीकृष्णाने शांततेचा करार करण्यासाठी पांडव आणि कौरवांमध्ये मध्यस्थी केली होती. श्रीकृष्णाला वाटत होते की, हे युद्ध टळायला हवे. श्रीकृष्ण म्हणतात की, भांडणातून प्रश्न कधीच सुटत नाही. शांततेच्या मार्गाने अनेक गोष्टी सहज सुटतात.