Xiaomi 14 CIVI आणि OnePlus 12R ची किंमत
Xiaomi 14 CIVI चा 8GB RAM व 256GB स्टोरेज मॉडेल 42,999 रुपयांमध्ये लाँच करण्यात आला आहे. याच्या 12GB RAM व 512GB स्टोरेज मॉडेल 47,999 रुपयांमध्ये येतो. लाँच ऑफर अंतगर्त फोनवर 3000 रुपयांचा ऑफ मिळत आहे, ज्यामुळे फोन 39,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. वनप्लस 12आर पाहता, फोनच्या 8GB RAM व 128GB स्टोरेज मॉडे तुम्ही 39,999 रुपयांमध्ये विकत घेऊ शकता.
डिस्प्ले कोणाचा चांगला?
Xiaomi 14 CIVI मध्ये 6.55 इंचाचा OLED डिस्प्ले देण्यात आला आहे. जो 2750 x 1236 पिक्सल रिजोल्यूशन आणि 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. तर OnePlus 12R मध्ये 6.78 इंचाचा AMOLED ProXDR डिस्प्ले देण्यात आला आहे. ज्याचे रिजोल्यूशन 2780 x 1264 पिक्सल आणि रिफ्रेश रेट 120Hz आहे.
पावर कुठून मिळते
Xiaomi 14 CIVI फोन Snapdragon 8s Gen 3 प्रोसेसरसह आला आहे, त्याचबरोबर 12GB पर्यंत RAM व 256GB पर्यंतची स्टोरेज मिळते. वनप्लस 12आर फोनमध्ये Qualcomm Snapdragon 8 Gen 2 प्रोसेसरसह आला आहे, सोबत 16GB पर्यंत RAM व 256GB पर्यंतची स्टोरेज मिळेल.
कॅमेरा कोणाचा दमदार?
फोटोग्राफीसाठी Xiaomi 14 CIVI फोनमध्ये Leica ब्रँडेड ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यात 50MP चा प्रायमरी, 50MP ची टेलीफोटो लेन्स आणि 12MP चा अल्ट्रा-वाइ़ सेन्सर मिळतो. सेल्फी व व्हिडीओ कॉलिंगसाठी या फोनमध्ये 32MP चा ड्युअल फ्रंट कॅमेरा मिळतो. तसेच, वनप्लस 12आर फोनमध्ये देखील ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळतो, ज्याचा प्रायमरी कॅमेरा 50MP चा आहे. त्याचबरोबर 8MP चा अल्ट्रा-वाइड कॅमेरा आणि 2MP च्या मॅक्रो लेन्सचा समावेश आहे. सेल्फीसाठी यात 16MP फ्रंट कॅमेरा आहे.
बॅटरी कोणाकडे जास्त
Xiaomi 14 CIVI ची बॅटरी 4700mAh ची आहे, त्याचबरोबर 67W फास्ट चार्जिंगचा सपोर्ट देण्यात आला आहे. वनप्लस 12आर मध्ये 5,500mAh ची बॅटरी देण्यात आली आहे, जी 100W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.