अमित शहांचा अँग्री लूक, माजी राज्यपालांना मंचावर कडक शब्दांत झापले; दिग्गज नेते पाहतच राहिले

अमरावती: लोकसभा निवडणुकीत दक्षिण भारतात भाजपसाठी के अन्नामलाई पोस्टर बॉय ठरले. त्यांचं कौतुक पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एनडीएच्या संसदीय दलाच्या बैठकीतही केलं. तमिळनाडू भाजपचे अध्यक्ष असलेल्या अन्नामलाईंसोबत भाजप नेत्या आणि माजी राज्यपाल तमिलीसाई सुंदरराजन यांचा ३६ चा आकडा आहे. अन्नामलाई यांच्याविरोधात उघड विधान करणाऱ्या सुंदरराजन यांना आता थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी समज दिली आहे.

तेलुगू देसम पक्षाचे अध्यक्ष चंद्राबाबू नायडूंनी काल आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. या सोहळ्याला अमित शहा उपस्थित होते. ते मंचावर बसले होते. त्यावेळी सुंदरराजन व्यासपीठावर आल्या. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडे पाहून त्यांनी हात जोडले. सगळ्यांना नमस्कार केला. व्यंकय्या नायडू, अमित शहा, जे. पी. नड्डा, नितीन गडकरी असे सगळे नेते रांगेत बसले होते. सगळ्यांना नमस्कार करत पुढे निघालेल्या सुंदरराजन यांना अमित शहांनी बोलावलं. यानंतर शहांनी सुंदरराजन यांना स्पष्ट शब्दांत समज दिली. त्यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर कठोर भाव दिसत होते.
एका बाबूंचा शपथविधी, दुसरे बाबू गैरहजर; नितीश गेले कुणीकडे? किंगमेकरच्या अनुपस्थितीची चर्चा
सुंदरराजन यांनी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर तेलंगणाचं राज्यपालपद सोडलं. त्यांना भाजपनं चेन्नई दक्षिणमधून उमेदवारी दिली. द्रमुकच्या उमेदवारानं त्यांचा सव्वा दोन लाख मतांनी पराभव केला. यानंतर सुंदरराजन यांनी प्रदेशाध्यक्ष अन्नामलाई यांच्यावर टिकेची झोड उठवली. ‘भाजपनं अण्णा द्रुमकसोबत युती केली असती तर पक्षाच्या अनेक जागा निवडून आल्या असत्या,’ असं सुंदरराजन म्हणाल्या होत्या.

सुंदरराजन यांनी लोकसभेतील पराभवानंतर अण्णामलाईंविरोधात उघड भूमिका घेतली. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांना पक्षात पदं दिली जातात, असं म्हणत सुंदरराजन यांनी अण्णामलाईंना लक्ष्य केलं. अण्णामलाई यावर बोलले नाहीत. पण हा वाद सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला. आता अमित शहांनी व्यासपीठावर सुंदरराजन यांना समज दिली आहे. शहांच्या अँग्री लूकचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Source link

amit shahtamil naduTamilisai BJPअमित शहातमिलसाईतमिळनाडूभाजप
Comments (0)
Add Comment