इंडिया आघाडीला लोकसभेत धक्का? ७ जणांची खासदारकी धोक्यात, नेमकं प्रकरण काय?

नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशनं दिलेला कौल देशभरात चर्चेचा विषय ठरला. सलग दोन निवडणुकांमध्ये भाजपनं उत्तर प्रदेशात ६० पेक्षा अधिक जागा जिंकल्या. त्यामुळे केंद्रात भाजपला बहुमत मिळालं. पण यंदा उत्तर प्रदेशनं भाजपला झटका दिला. गेल्या वेळी भाजपचे ६२ उमेदवार निवडून देणाऱ्या भाजपच्या जागा ३३ वर आणल्या. राज्यात समाजवादी पक्षाचे सर्वाधिक ३७ उमेदवार निवडून आले. तर काँग्रेसचे ६ उमेदवार विजयी झाले. त्यामुळे इंडिया आघाडीला मोठं यश मिळालं. पण यातील ६ खासदारांचं भवितव्य धोक्यात आहे. त्यांची खासदारकी रद्द होऊ शकते.

उत्तर प्रदेशातून निवडून गेलेल्या ११ जणांविरोधात गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्यांच्याविरोधात खटले सुरु आहेत. त्यांना २ वर्षांपेक्षा अधिक काळाची शिक्षा झाल्यास त्यांचं लोकसभा सदस्यत्व रद्द होऊ शकतं. त्यामुळे त्यांच्या खासदारकीवर टांगती तलवार आहे. समाजवादी पक्षाच्या ५, काँग्रेसच्या एका खासदारची रद्द होऊ शकते. आझाद समाज पक्षाचे संस्थापक चंद्रशेखर आझाद यांचंही लोकसभा सदस्यत्व जाऊ शकतं. या खासदारांविरोधात मनी लॉण्ड्रिंगसह गँगस्टर कायद्याच्या अंतर्गत गुन्हे दाखल आहेत. यामध्ये दोषी आढळल्यास तुरुंगवास होऊ शकतो.
अमित शहांचा अँग्री लूक, माजी राज्यपालांना मंचावर कडक शब्दांत झापले; दिग्गज नेते पाहतच राहिले
समाजवादी पक्षाचे गाझीपूरचे खासदार अफझल अन्सारी, जौनपूरचे खासदार बाबू सिंह कुशवाहा, सुलतानपूरचे खासदार राम भूपाल निषाद, चंदोलीचे खासदार विरेंद्र सिंह, आझमगढचे खासदार धर्मेंद्र यादव, बस्तीचे खासदार राम प्रसाद चौधरी, सहारणपूरचे काँग्रेस खासदार इमरान मसूद यांच्याविरोधात गंभीर गुन्ह्यांप्रकरणी खटले सुरु आहेत. याशिवाय फतेहपूर सिकरीचे भाजप खासदार राजकुमार चहार, हाथरसचे भाजप खासदार अनुप प्रधान, बिजनोरचे आरएलडीचे खासदार चंदन चौहान, बागपतचे खासदार राजकुमार संगवान, आझाद समाज पक्षाचे खासदार चंद्रशेखर आझाद यांच्याविरोधात गंभीर गुन्हे दाखल आहेत.
एका बाबूंचा शपथविधी, दुसरे बाबू गैरहजर; नितीश गेले कुणीकडे? किंगमेकरच्या अनुपस्थितीची चर्चा
लोकप्रतिनिधींना २ वर्षांपेक्षा अधिकची शिक्षा झाल्यास त्याचं पद रद्द होतं. या नियमानुसार समाजवादी पक्षाच्या ५ खासदारांसह काँग्रेसच्या एका खासदाराचं पद जाऊ शकतं. भाजप आणि त्यांचा मित्र पक्ष आरएलडी यांच्या प्रत्येकी दोन खासदारांवर टांगती तलवार आहे. न्यायालयानं त्यांना २ वर्षांपेक्षा अधिकच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावल्यास त्यांची खासदारकी रद्द होऊ शकते.

Source link

indi alliancelok sabhaNDAइंडी आघाडीखासदारलोकसभा
Comments (0)
Add Comment