‘मुंज्या’ने मंगळवारी ४.२१ कोटी एवढी कमाई केली. ‘मुंज्या’ने ओपनिंग डेला जेवढे कमावले होते, तेवढी कमाई या पाचव्या दिवशी केली. यानंतर सहाव्या दिवशी अर्थात बुधवारी १२ जून रोजी या सिनेमाने ४.११ कोटी रुपये कमावले. यानंतर ‘मुंज्या’चे एकूण बॉक्स ऑफिस कलेक्शन ३२.४७ कोटींवर पोहोचले आहे. यावरुन असे चित्र आहे आहे प्रदर्शित झाल्यानंतर पहिल्याच दिवशी हा चित्रपट ३५ कोटींचा टप्पा गाठू शकतो.
‘मुंज्या’ने प्रत्येक दिवशी किती कमावले?
७ जून २०२४, पहिला दिवस – ४.२१ कोटी
८ जून २०२४, दुसरा दिवस- ७.४० कोटी
९ जून २०२४, तिसरा दिवस- ८.४३ कोटी
१० जून २०२४, चौथा दिवस- ४.११ कोटी
११ जून २०२४, पाचवा दिवस- ४.२१ कोटी
१२ जून २०२४, सहावा दिवस- ४.११ कोटी
एकूण कमाई- ३२.४७ कोटी
वर्षातील तिसरा हिट सिनेमा
दिनेश विजान आणि अमर कौशिक यांनी ‘मुंज्या’ची निर्मिती केली आहे, ज्यांनी ‘स्त्री’, ‘भेडिया’सारखे सिनेमे दिले आहेत. या सिनेमात शर्वरी-अभय यांच्यासह मोना सिंह, सुहास जोशी, भाग्यश्री लिमये, अजय पुरकर, तरन सिंग, सत्यराज, खुशी हजारे, आयुष उलगड्डे, श्रुती मराठे अशी तगडी स्टारकास्ट आहे. ‘आर्टिकल ३७०’ आणि ‘शैतान’नंतर ‘मुंज्या’ हा या वर्षातील तिसरा हिट सिनेमा ठरला आहे. सध्याच्या आकडेवारीवरुन असा अंदाज व्यक्त केला जातो आहे की, हा चित्रपट लाइफटाइम ७५-८० कोटींची कमाई करेल. मात्र जर हा सिनेमा १०० कोटी क्लबमध्ये पोहोचला तरी आश्चर्य वाटायला नको.
‘मिस्टर अँड मिसेस माही’चे हालबेहाल
दुसरीकडे अद्यापही ‘मिस्टर अँड मिसेस माही’ सिनेमागृहात असला तरी बुधवारी या सिनेमाने अवघे ९० लाख रुपये कमावले. एकूण १३ दिवसात जान्हवी कपूर आणि राजकुमार राव यांच्या या सिनेमाने ३२.५५ कोटी कमावले आहे. ४० कोटींच्या बजेटमध्ये हा सिनेमा बनवण्यात आल्याने, त्या आकड्यापेक्षाही कमाई बरीच कमी आहे.
‘चंदू चॅम्पियन’शी टक्कर
शुक्रवारी १४ जून रोजी कार्तिक आर्यन स्टारर ‘चंदू चॅम्पियन’ हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे ‘मुंज्या’ला थोडेफार नुकसान सहन करावे लागू शकते. त्यामुळे ‘मुंज्या’ १०० कोटींच्या क्लबमध्ये पोहोचेल अशी भविष्यवाणी आताच करणे चुकीचे ठरू शकते. कारण ‘चंदू चॅम्पियन’नंतर प्रभासच्या ‘कल्कि २८९८ एडी’शीदेखील या सिनेमाला दोन हात करायचे आहेत. असे असले तरी २५-३० कोटीच्या बजेटमध्ये तयार झालेल्या ‘मुंज्या’ने पहिल्याच आठवड्यात बजेटपेक्षा अधिक कमाई करणे उल्लेखनीय आहे.