Oppo F27 Pro+ 5G ची किंमत
कंपनीनं हा फोन 8जीबी रॅम व 128जीबी आणि 8जीबी रॅम व 256जीबी स्टोरेजसह सादर केला आहे. फोनच्या 128जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 27,999 रुपये आहे. तसेच, 256जीबी स्टोरेज व्हेरिएंटसाठी तुम्हाला 29,999 रुपये खर्च करावे लागतील. या फोनची प्री-ऑर्डर सुरु जाऊ झाली असून विक्री 20 जूनपासून सुरु होईल. फोन डस्क पिंक आणि मिडनाइट नेव्ही या दोन कलर मध्ये लाँच करण्यात आला आहे. हा कंपनीच्या वेबसाइट, अॅमेझॉन आणि फ्लिपकार्ट वरून प्री-ऑर्डर करता येईल. HDFC, SBI किंवा ICICI बँक कार्डने पेमेंट केल्यास 10 टक्के कॅशबॅक मिळेल.
Oppo F27 Pro+ 5G चे स्पेसिफिकेशन्स
फोनमध्ये कंपनी 2412×1080 पिक्सल रिजोल्यूशनसह 6.7 इंचाचा फुल एचडी+ AMOLED कर्व्ड डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 120Hz रिफ्रेश रेट आणि 240Hz टच सॅंप्लिंग रेटला सपोर्ट करतो. या डिस्प्लेची पीक ब्राइटनेस लेव्हल 950 निट्स आहे.
फोन 8जीबी LPDDR4x रॅम आणि 256जीबी पर्यंतच्या UFS 3.1 स्टोरेजसह आला आहे. प्रोसेसर म्हणून कंपनीनं कंपनी मीडियाटेक डायमेन्सिटी 7050 चिपसेटचा वापर केला आहे. हा फोन अँड्रॉइड 14 आधारित ColorOS 14 वर चालतो.
फोटोग्राफीसाठी फोनमध्ये एलईडी फ्लॅशसह दोन कॅमेरे देण्यात आले आहेत. यात 64 मेगापिक्सलच्या मुख्य कॅमेऱ्यासह एक 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर देण्यात आला आहे. तसेच, सेल्फीसाठी कंपनी या फोनमध्ये 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे.
फोनमध्ये देण्यात आलेली बॅटरी 5000mAh ची आहे, जी 67 वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. बायोमेट्रिक सिक्योरिटीसाठी फोनमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे. कनेक्टिव्हिटीसाठी फोनमध्ये तुम्हाला Wi-Fi 6 802.11 ax (2.4GHz + 5GHz), 5G SA/NSA, ड्युअल 4G VoLTE, ब्लूटूथ 5.3, जीपीएस आणि यूएसबी टाइप-C पोर्ट सारखे ऑप्शन मिळतील.