‘या’ smart plug मुळे तुमचे एसी,कुलर आणि इतर डिव्हाईसेसही करतील वीज बचत; किंमतही आहे कमी

जर तुम्ही वेळोवेळी वापर झाल्यानंतर तुमचे इलेक्ट्रॉनिक डिव्हाईस बंद करायला विसरत असाल आणि त्यामुळे तुम्हाला दरमहा प्रचंड वीज बिल भरावे लागत असेल तर आता काळजी करू नका, एक स्मार्ट प्लग आहे जो तुम्हाला या समस्येवर मात करण्यास मदत करेल. स्मार्ट प्लग तुम्हाला तुमचे वीज बिल वाचवण्यास कशी मदत करू शकते याची माहिती येथे देत आहोत.

ऑनलाईन मिळतील स्मार्टप्लग

तुम्हाला Amazon आणि Flipkart वर Qubo, Wipro, Homemate आणि Zebronics सारख्या कंपन्यांचे स्मार्ट प्लग सहज मिळतील. वायफाय आणि ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी स्मार्ट प्लगसह सपोर्टेड आहे. तुमच्या घरात स्मार्ट प्लग कोणत्याही डिव्हाइसला कनेक्ट केलेले असले तर तुम्ही कंपनीच्या ॲपवरूनच ते डिव्हाइस कंट्रोल करू शकता.

स्मार्ट प्लगद्वारे करा डेली शेड्युल

या स्मार्ट प्लगद्वारे तुम्हाला दिनचर्या शेड्यूल करण्याची सुविधा मिळते.उदाहरणार्थ, समजा तुम्ही हिवाळ्यात गीझर चालू करण्यासाठी सकाळी 6 वाजता उठता, तर तुम्ही ॲपद्वारे या स्मार्ट प्लगसाठी शेड्यूल टाइमर सेट करू शकता आणि मग तुम्ही या कामासाठी उठले नाही तरी गीझर सकाळी 6 वाजता चालू होईल. या व्यतिरिक्त, तुम्ही गीझर बंद करण्यासाठी देखील टायमरसेट करू शकता, उदाहरणार्थ, समजा तुम्हाला 25 मिनिटांनी गीझर बंद करायचा असेल तर तुम्ही सकाळी 6:25 पर्यंत टायमर सेट करू शकता. केवळ गीझरच नाही तर एसी, टीव्ही, हीटर अशी इतर अनेक गृहोपयोगी उपकरणे आहेत जी तुम्ही स्मार्ट प्लगला कनेक्ट करू शकता.

अशा प्रकारे वापरा

तुम्हाला या स्मार्ट प्लगला कोणत्याही डिव्हाइसशी कनेक्ट करायचे असेल तर फक्त त्या डिव्हाइसचा प्लग या स्मार्ट प्लगशी कनेक्ट करा आणि त्यानंतर ॲपद्वारे टायमर सेट करा. यानंतर, तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही, तुम्ही विसरलात तरीही, हा स्मार्ट प्लग तुम्ही सेट केलेल्या वेळी डिव्हाइस बंद करेल.

स्मार्ट प्लगची किंमत

Amazon आणि Flipkart वर विकल्या जाणाऱ्या स्मार्ट प्लगची किंमत साधारणपणे रु. 700 ते रु. 1000 पर्यंत असते. कंपनीच्या साइटशिवाय, हा स्मार्ट प्लग ॲमेझॉनवरून देखील खरेदी केला जाऊ शकतो.



Source link

electronic devicesenergy savingsmart plugइलेक्ट्रॉनिक उपकरणेऊर्जा बचतस्मार्ट प्लग
Comments (0)
Add Comment