Reasi Terror Attack : रियासी बस दहशतवादी हल्ला प्रकरण : पोलिसांची मोठी कारवाई, ५० संशयितांना घेतलं ताब्यात

जम्मू-काश्मीर : जम्मू-काश्मीरमधील रियासी या भागात रविवार (९ जून) रोजी एका यात्रेकरूंच्या बसवर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. या हल्ल्याची चौकशी करत असताना पोलिसांना मोठे यश आले असून ५० संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे.

हल्लेखोरांना शोधण्यासाठी शोध मोहीम सुरू

दरम्यान,दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी विविध जिल्ह्यांतील जंगल भागात मोठ्या प्रमाणावर पोलिसांकडून शोधमोहीम राबवली जात आहे. या मोहिमेदरम्यान ५० संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका महिलेने दोन व्यक्तींच्या संशयास्पद हालचालींची तक्रार केली होती. त्यानंतर पोलिसांनी निमलष्करी दलांसह जम्मूच्या बाहेरील नरवाल बायपास भागात शोध मोहीम सुरू केली.

दहशतवाद्यांकडून ३ ठिकाणी हल्ले

गेल्या चार दिवसांत, दहशतवाद्यांनी रियासी, कठुआ आणि डोडा या तीन जिल्ह्यांमध्ये हल्ले केले असून त्यात नऊ यात्रेकरूंचा मृत्यू झाला. त्याचबरोबर केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF) एक जवान शहीद झाला आहे. तर सात सुरक्षा कर्मचाऱ्यांसह अनेक जण जखमी झाले आहेत. कठुआमध्ये सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत दोन संशयित पाकिस्तानी दहशतवादीही मारले गेले. तसेच त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात असणारा शस्त्रास्त्रे, दारूगोळा जप्त करण्यात आला आहे.
Jammu-Kashmir Attack : दहशतवाद विरोधी क्षमतांच्या तमाम यंत्रणा तैनात करा,पंतप्रधान मोदींकडून जम्मू-काश्मीरमधील परिस्थितीचा आढावा

हल्लेखोरांची माहिती देणाऱ्यास २० लाखांचे बक्षीस जाहीर

रियासी जिल्ह्यात यात्रेकरूंना घेऊन जाणाऱ्या बसवर झालेल्या हल्ल्यात सहभागी असलेल्या दहशतवाद्याची माहिती देणाऱ्यास पोलिसांनी २० लाख रुपयांचे रोख बक्षीस जाहीर केले आहे. त्याचबरोबर त्यांचे स्केच देखील प्रसिद्ध करण्यात आले.

कठुआतील कारवाईत दोन दहशतवादी ठार

रविवारी घडलेल्या घटनेनंतर निमलष्कर दलाने दहशतवाद्यांविरोधात कारवाई सुरू केली आहे. कारवाई सुरू असताना कठुआमध्ये मंगळवारी निमलष्कर दलाचे जवान आणि दहशतवादी यांच्यात चकमक झाली. या चकमकीमध्ये दोन दहशतवाद्यांना ठार करण्यात यश आले असून, एक जवान शाहिद झाला. तर एक नागरिक जखमी झाला आहे.



Source link

Jammu and kashmirjammu kashmir news todayjammu kashmir terror attackjammu kashmir terrorismजम्मू- काश्मीरजम्मू-कश्मीर न्यूज़दहशतवादी हल्ला
Comments (0)
Add Comment