Rajya Sabha Election: लोकसभा निवडणुकीनंतर पुन्हा एकदा NDA विरुद्ध इंडियाची लढाई; राज्यसभेच्या १० जागा रिक्त, पाहा कोणाला मिळणार विजय

नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर आता राज्यसभेच्या १० जागा रिक्त झाल्या आहेत. राज्यसभा सचिवालकाकडून या रिक्त झालेल्या जागांसाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. राज्यसभेचे सदस्य असलेले १० जण नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत विजयी झाले आहेत. त्यामुळे आता लोकसभेनंतर राज्यसभा निवडणुकीत पुन्हा एकदा एनडीए विरुद्ध इंडिया अशी लढत पाहायला मिळणार आहे. यात महाराष्ट्र आणि हरियाणा या दोन राज्यातील लढती चुरशीच्या होतील. संसदेच्या या वरिष्ठ सभागृहात भाजपचे ५ उमेदवार निवडूण येण्याची शक्यता आहे.

कोणत्या राज्यात किती जागा

निवडणूक आयोगाकडून अद्याप राज्यसभेच्या १० जागांसाठीच्या तारखांची घोषणा करण्यात आलेली नाही. ज्या १० जागांवर निवडणुका होतील सध्या त्यापैकी ७ जागा भाजप, २ काँग्रेस आणइ एक राष्ट्रीय जनता दलाकडे आहे. काँग्रेस आणि राजद हे दोन्ही पक्ष इंडिया आघाडीचे घटक आहेत. लोकसभा निवडणुकीत भाजपचे राज्यसभेतील सदस्य सर्बानंद सोनोवाल (आसाम), ज्योतिरादित्य शिंदे (मध्य प्रदेश), पीयुष गोयल (महाराष्ट्र) हे विजयी झालेत आहेत. तर रिक्त झालेल्या जागांमध्ये आसाम, बिहार आणि महाराष्ट्र मधील प्रत्येकी २, हरियाणा, मध्य प्रदेश, राजस्थान आणि त्रिपूरातील प्रत्येकी एका जागेचा समावेश आहे.
Raj Thackeray: २० जागा लढणार असल्याची पुडी कुणी तरी सोडली; २० जागा का? आपण २०० ते २२५ जागा लढवित आहोत, पण…

आसाममधील दोन जागा, त्रिपूरा, मध्य प्रदेश आणि राजस्थानमधील प्रत्येकी एका जागेवर विजय मिळवण्यात इतके संख्याबळ भाजपकडे आहे. बिहारमध्ये भाजप आणि राजदला प्रत्येकी एक जागा मिळेल. पण महाराष्ट्र आणि हरियाणातील चित्र वेगळे आहे. विधानसभेच्या ९० जागा असलेल्या हरियाणातील सदस्य संख्या सध्या ८७ आहे. ज्यात भाजपचे ४१ तर काँग्रेसचे २९ सदस्य आहेत. अपक्ष आमदारांच्या मदतीने भाजपचे संख्या ४३ होते. तर विरोधक किमान कागदावर ४४ आहेत. ज्यात २९ काँग्रेस, १० जेजेपीचे आमदार आहेत. अन्य चार अपक्षांनी काँग्रेसला पाठिंबा दिलाय. राज्यातील सर्व अपक्ष आमदारांनी काँग्रेसला पाठिंबा दिला तर हरियाणात भाजपचा पराभव होऊ शकतो. जून २०२२ मध्ये दोन जागांसाठी राज्यात काँग्रेसकडे पुरेसे संख्याबळ होते. मात्र तेव्हा क्रॉस व्होटिंगमुळे अजय माकन यांचा पराभव झाला होता.
Jagannath Temple: सत्तेत येताच भाजप सरकारने पुरीच्या जगन्नाथ मंदिराचे ३ द्वार केले खुले; इतके वर्ष का बंद होते द्वार? जाणून घ्या संपूर्ण गोष्ट

महाराष्ट्रात चुरस

हरियाणा पाठोपाठ भाजपसाठी महाराष्ट्रातील लढत चुरशीची होणार आहे. मोदी ३.० मध्ये शिंदे आणि अजित पवार गटांना समाधानकारक स्थान न मिळाल्याने हे दोन्ही पक्ष नाराज आहेत.



Source link

nda vs indiarajya sabha electionRajya Sabha Election 2024rajya sabha vacent seats electionराज्यसभा निवडणूक २०२४
Comments (0)
Add Comment