Google Pixel 8 वरील ऑफर
Google Pixel 8 स्मार्टफोन Flipkart वर 61,999 रुपयांच्या बेस प्राइसमध्ये विकला जात आहे. या किंमतीत स्मार्टफोनचा बेस 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज व्हेरिएंट मिळतो. कंपनीनं हा स्मार्टफोन गेल्यावर्षी ऑक्टोबरमध्ये 75,999 रुपयांची प्रारंभिक किंमतीत लाँच केला होता. आता यावर 14,000 रुपयांचा डिस्काउंट मिळत आहे. तसेच 256GB स्टोरेज व्हेरिएंट 11,000 रुपयांच्या डिस्काउंटसह 82,999 रुपयांच्या ऐवजी 71,999 रुपयांमध्ये लिस्ट करण्यात आला आहे.
थेट डिस्काउंटसह Flipkart काही एक्स्ट्रा ऑफर्स देखील देखील देत आहे. विशेष म्हणजे हा फोन 60,500 रुपयांपर्यंतच्या एक्सचेंज ऑफरसह उपलब्ध आहे. तसेच ICICI बँकेच्या क्रेडिट किंवा डेबिट कार्ड ट्रँजॅक्शनवर 8,000 रुपयांचा एक्स्ट्रा डिस्काउंट मिळेल. तर Flipkart Axis बँक कार्ड धारकांना 5 टक्के फ्लॅट कॅशबॅक मिळेल. इतर अनेक ऑफर फ्लिपकार्टवर दिल्या जात आहेत.
Google Pixel 8 मध्ये आहे तरी काय?
Pixel 8 ड्युअल-सिम स्मार्टफोन आहेत, ज्यात Android 14 ऑपरेटिंग सिस्टम मिळते. यात 120Hz रिफ्रेश रेटसह 6.2-इंचाचा FHD+ (1,080×2,400 पिक्सल) OLED डिस्प्ले मिळतो, जो 2,000 nits पीक ब्राइटनेसला सपोर्ट करतो. यात Google चा Tensor G3 चिपसेट आणि Titan M2 सिक्योरिटी चिप आहे. स्मार्टफोनमध्ये ड्युअल कॅमेरा आहे, ज्यात 8x सुपर-रेज डिजिटल झूमसह 50MP ऑक्टा-PD कॅमेरा आणि दुसरा ऑटोफोकस आणि मॅक्रो क्षमता असलेला 12MP सेंकडरी सेन्सर आहे. फ्रंटला ऑटोफोकस सपोर्टसह 10.5MP चा सेल्फी कॅमेरा आहे.
कनेक्टिव्हिटीसाठी Wi-Fi 6E, 5G, 4G LTE, ब्लूटूथ 5.3, GPS, NFC आणि एक USB Type-C पोर्ट मिळतो. तसेच, एक्सेलेरोमीटर, बॅरोमीटर, जायरोस्कोप, मॅग्नेटोमीटर, प्रॉक्सिमिटी सेन्सर आणि बायोमेट्रिक ऑथेंटिकेशनसाठी एक फिंगरप्रिंट स्कॅनर देखील आहे. Pixel 8 मध्ये 27W वायर्ड आणि 18W वायरलेस चार्जिंग सपोर्टसह 4,575mAh ची बॅटरी मिळते.