इंद्रेश कुमार म्हणाले, की भगवान श्रीराम सर्वांना न्याय देतात. २०२४ च्या लोकसभा निवडणुकाच बघा. ज्यांनी रामाची पूजा केली, पण हळूहळू त्यांच्यात अहंकार निर्माण झाला. त्या पक्षाला सर्वात मोठा पक्ष बनवलं, पण त्यांना जे पूर्ण अधिकार मिळायला हवे होते, जे सामर्थ्य मिळायला हवे होते, ते देवाने त्याच्या अहंकारामुळे रोखले.
इंद्रेश कुमार पुढे म्हणाले की, रामाला विरोध करणाऱ्यांना कोणतीही ताकद मिळाली नाही. त्यांच्यापैकी कुणालाही सत्ता दिली नाही. एकत्र येऊनही ते नंबर १ बनले नाहीत. क्रमांक दोनवरच राहिले. म्हणून देवाचा न्याय विचित्र नाही. तो खरा आहे. हे खूप आनंददायक आहे.
भाजपचा उल्लेख करताना इंद्रेश कुमार म्हणाले, ज्या पक्षाने (भगवान रामाची) भक्ती केली, पण अहंकारी झाला, तो पक्ष २४१ वर थांबला, पण सर्वात मोठा पक्ष बनला. ज्यांचा रामावर विश्वास नव्हता, ते एकत्रितपणे २३४ वर अडकले.
लोकशाहीत रामराज्याचे विधान बघा, ज्यांनी रामाची पूजा केली, पण हळूहळू अहंकारी झाले, तो पक्ष सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला, पण जी मते आणि सत्ता त्यांना मिळायला हवी होती, ती त्यांच्या अहंकारामुळे देवाने थांबवली, असेही इंद्रेश कुमार म्हणाले.
रामाला विरोध करणाऱ्यांपैकी कुणालाही सत्ता मिळाली नाही. अगदी सगळ्यांना मिळून नंबर दोन करण्यात आले. देवाचा न्याय खरा आणि आनंददायक आहे. जे रामाची पूजा करतात त्यांनी नम्र असले पाहिजे आणि जे रामाला विरोध करतात, त्यांच्याशी देव स्वतः निपटतात, असेही इंद्रेश कुमार म्हणाले.
Read Latest Maharashtra News Updates And Marathi News
भगवान राम भेदभाव करत नाहीत आणि शिक्षाही करत नाहीत. राम कोणाला दुःखी करत नाहीत. राम सर्वांना न्याय देतात आणि देत राहतील. प्रभू राम नेहमी न्यायी राहिलेत, आणि नेहमीच न्यायी असतील. प्रभू रामाने लोकांचे रक्षण केले आणि रावणाचेही भले केले.