WhatsAppने आणले प्रोफाईल फोटोविषयीचे सर्वात मोठे अपडेट, यूजर्स यापुढे हे करू शकणार नाहीत

व्हॉट्सॲपने युजर्ससाठी एक नवीन फीचर आणले आहे. अनेक दिवसांपासून यूजर्स या फीचरची मागणी करत होते. हे युजर्सच्या प्रायव्हसीशी संबंधित आहे. WhatsApp आपल्या नवीन अपडेटमध्ये प्रोफाईल फोटोंचे स्क्रीनशॉट ब्लॉक करत आहे. कंपनीने हे फीचर यूजर्सच्या सुरक्षेसाठी आणले आहे, जेणेकरून प्रोफाईल फोटोचा गैरवापर रोखता येईल. WABetaInfo ने व्हॉट्सॲपमधील या नवीन फीचरची माहिती दिली आहे. WABetaInfo ने आपल्या पोस्टमध्ये या फीचरचा स्क्रीनशॉट देखील शेअर केला आहे.

WABetaInfoने शेअर केला स्क्रीनशॉट

शेअर केलेल्या स्क्रीनशॉटमध्ये तुम्ही पाहू शकता की WhatsApp ने स्क्रीन कॅप्चर ब्लॉक केले आहे. या फीचरच्या माध्यमातून व्हॉट्सॲपला सर्व यूजर्सची प्रायव्हसी आणखी सुधारायची आहे. WABetaInfo ने iOS 24.12.10.74 साठी WhatsApp बीटामध्ये हे नवीन फिचर शोधले आहे. ते TestFlight ॲपवर उपलब्ध आहे. बीटा टेस्टिंगनंतर, कंपनी ग्लोबल यूजर्ससाठी हे फिचर आणणार आहे.

व्हॉट्सॲपचे हे नवीन फीचर चांगले असले तरी यामुळे प्रोफाइल फोटो कॅप्चर करणे पूर्णपणे थांबणार नाही नाही कारण कोणाला हवे असल्यास, ते दुसऱ्या डिव्हाइसवरून कोणत्याही युजरच्या डीपीवरचा फोटो क्लिक करू शकतात.

फेव्हरेट चॅट्स आणि ग्रुप फीचर देखील आणले जात आहे

WhatsApp आपल्या iOS युजर्ससाठी फेव्हरेट चॅट्स आणि ग्रुप्स फीचर आणण्याची तयारी करत आहे. WABetaInfo ने देखील या फीचरच्या रिलीजबद्दल माहिती दिली आहे. WhatsApp ने अलीकडेच ॲप स्टोअरवर व्हॉट्सॲप फॉर iOS 24.11.85 अपडेट सादर केले. कंपनीच्या अधिकृत चेंजलॉगमध्ये नवीन फिचर्स दिलेले नाहीत. तरीही, आता असे दिसते आहे की कंपनी लवकरच iOS युजर्ससाठी फेव्हरेट चॅट आणि ग्रुप फिल्टर करण्याचे फिचर ऑफर करणार आहे.
शेअर केलेल्या स्क्रीनशॉटमध्ये तुम्ही हे फिचर पाहू शकता. यामध्ये कंपनी स्क्रीनच्या बॉटमवर दिलेल्या चॅट ऑप्शनमध्ये ऑफर करणार आहे. सध्या हे फिचर काही निवडक युजर्ससाठी उपलब्ध आहे. जर तुम्ही बीटा यूजर असाल, तर तुम्ही ॲप स्टोअरवर असलेले लेटेस्ट अपडेटमध्ये हे फिचर बघू शकता.



Source link

Betaprivacy updateWhatsApp New featurewhatsapp new updateswhatsapp profile photo privacy
Comments (0)
Add Comment