गोरखनाथमधील जटेपूरमध्ये राहणारे अंगद गुप्ता जवळपास ९ वर्ष पूर्ण कुवेतमध्ये गेले होते. ते एका खासगी कंपनीत कॅशियर म्हणून काम करत होते. गुरुवारी मंगाफ शहरात बहुमजली मॉलमध्ये लागलेल्या आगीत त्यांचा मृत्यू झाला. गुरुवारी त्यांच्या कुटुंबियांना कॉल आला आणि त्यांच्या मृत्यूची माहिती मिळाली.
अंगद गुप्ता यांचं मंगळवारी कुटुंबियांशी बोलणं झालं होतं. फोनवर त्यांनी कुटुंबियांची ख्याली-खुशाली विचारली आणि मुलांना अभ्यासात लक्ष देऊन, मन लावून काम करण्याचं सांगितलं. त्यानंतर गुरुवारी अंगद यांच्या मृत्यूची बातमी आली. या घटनेने अंगद यांच्या कुटुंबियांसह त्यांच्या परिसरातही शोक व्यक्त केला जात आहे. अंगद यांच्या लहान भाऊ पंकज गुप्ताने सांगितलं, की कुटुंबात त्याचे मोठे भाऊ अंगद हे एकमेव कमावते होते. या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण कुटुंब कोलमडलं असून आता कुटुंबावर त्यांच्या पालनपोषणाचं आणि आर्थिक संकट उभं ठाकलं आहे.
अंगद गुप्ता यांच्या पश्चात पत्नी रीता देवी, मोठी मुलगी अंशिका गुप्ता, मोठा मुलगा आषुतोष गुप्ता आणि लहान मुलगा सुमित असं कुटुंब आहे. कुटुंबियांनी केंद्र सरकारकडे मृतदेह सुरक्षित घरी आणण्यासह मोठी मुलीला नोकरी आणि आर्थिक मदतीची मागणी केली आहे.
कुवेतमधील मंगाफ आगीत मृत्यू झालेल्या ४५ भारतीयांचे मृतदेह भारतीय वायुसेनेचं विमान केरळच्या कोची विमानतळावर लँड झालं आहे. भारतीयांचे मृतदेह घेऊन वायुसेनेचं सी-१३० जे सुपर हरक्यूलिस विमान रवाना झालं होतं, जे कोचीमध्ये पोहोचलं आहे.
कुवेत मीडियानुसार, आग स्वयंपाकघरात लागली होती. अनेक मृत्यू धुराने झाल्याचं सांगण्यात आलं आहे. १२ जूनला बुधवारी पहाटे ४.३० वाजता आगीची माहिती मिळाली. यावेळी लोक गाढ झोपेत होते. बांधकाम कंपनी NBTC ग्रुपने १९५ हून अधिक श्रमिकांच्या राहण्यासाठी ही इमारत भाडेतत्वावर घेतली होती. या इमारतीमध्ये राहणारे अनेक श्रमिक केरळ, तमिळनाडू आणि उत्तरेकडील राज्यातील होते.