Tirumala Tirupati: तिरुपती मंदिर हिंदूंच्या हातात राहणार, तिरुमला येथे फक्त ‘जय गोविंदा’चा जयघोष; चंद्राबाबू नायडूंची मोठी घोषणा

अमरावती: आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून चौथ्यांचा शपथ घेतल्यानंतर एन चंद्रबाबू नायडू यांनी कुटुंबासह तिरुपती वेंकटेश स्वामीचे दर्शन घेतले. पूजा-अर्चना केल्यानंतर त्यांनी देशाचे सर्वात श्रीमंत मंदिर असलेल्या तिरुमला तिरुपती देवस्थान (TTD) समितीमध्ये मोठ्या बदलाचे संकेत दिले आहेत.

चंद्रबाबू यांनी मंदिर प्रशासनाच्या समितीवर गैर हिंदू चेअरमन करण्यावरून प्रश्न चिन्ह उपस्थित केले. तिरुमलामध्ये फ्कत गोविंदा नाव ऐकायला येईल अन्य कोणतेही नाही. येथे ‘ओम नमो वेंकटेश्वराय’ शिवाय अन्य कोणताही जयघोष होणार नाही. मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्यावरून हे स्पष्ट झाले आहे की, टीटीडी ट्रस्टचे चेअरमन हिंदूच असतील.

जगन मोहन रेड्डी यांच्या कार्यकाळात टीटीडीचे चेअरमनपदी भुमना करुणाकर रेड्डी यांची नियुक्ती करण्यात आली होती. करुणाकर रेड्डी यांचे कुटुंबिय ख्रिश्चन धर्माचे पालन करतात. त्यामुळे त्यांची नियुक्तीवरन वाद झाला होता. हिंदू धर्मगुरूंसोबत टीडीपी आणि भाजपने या नियुक्तीवर प्रश्न उपस्थित केले होते. आंध्र प्रदेशची एकूण लोकसंख्या २४ कोटी आहे. ज्यात ८२ टक्के हिंदू लोक आहेत. चंद्रबाबू नायडू यांनी घेतलेला हा निर्णय राज्यातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या समाजाला विचारात घेऊन करण्यात आला आहे.
Rajya Sabha Election: लोकसभा निवडणुकीनंतर पुन्हा एकदा NDA विरुद्ध इंडियाची लढाई; राज्यसभेच्या १० जागा रिक्त, पाहा कोणाला मिळणार विजय

देशातील सर्वात श्रीमंत मंदिर

तिरुपतीमधील श्री वेंकेंटेश्वरा मंदिर हे देशातील सर्वात श्रीमंत मंदिर आहे. या मंदिरात प्रत्येक दिवशी ६० हजार भाविक येतात. प्रत्येक वर्षी ३ कोटींहून अधिक भक्त दर्शनासाठी येतात. तर तिरुमला ब्रह्मोत्सवाच्या १० दिवसात प्रत्येक दिवशी ३ लाखाहून अधिक भक्त दर्शनासाठी येतात. असे मानले जाते की या मंदिराकडे ३७ हजार कोटी रुपयांची संपत्ती आहे आणि प्रत्येक वर्षी १ हजार ५०० कोटींहून अधिक रुपयाचे दान मिळते. या शिवार मंदिराकडे १०.५ टन सोने देखील आहे. टीटीडी ट्रस्टकडून भक्तांच्या भोजन अन्य सुविधांसाठी ४ हजार कोटी खर्च केला जातो. गेल्या वर्षी टीटीडी बोर्डाने ४ हजार ४११ कोटी रुपयांचे बजेट मंजूर केले होते.

ख्रिश्चन धर्माचे पालन करणारी व्यक्ती झाली हिंदू मंदिराच्या ट्रस्टची चेअरमन

तिरुपती मंदिरावरून २०२२ मध्ये मोठा वाद झाला होता. जेव्हा जगन मोहन रेड्डी यांनी टीटीडी ट्रस्ट बोर्डच्या चेअरमनपदी भुमना करुणाकर रेड्डी यांची दुसऱ्यांदा नियुक्ती केली होती. जगन मोहन रेड्डी आणि करुणाकर रेड्डी हे ख्रिश्चन धर्माचे पालन करतात. यावरून तेलगूदेशम आणि भाजपने विरोध केला होता. त्यावर करुणाकर रेड्डी यांनी असे स्पष्टीकरण दिले होते की, त्यांचे कुटुंबीय ख्रिश्चन धर्माचे पालन करतात पण ते हिंदू धर्माला मानतात. त्यानंतर रेड्डी यांच्यावर मंदिराचे कामकाज करताना हिंदू परंपरा आणि ट्रस्ट नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप करण्यात आला.

तिरुमला तिरुपती मंदिरातील दुसरा वाद सप्टेंबर २०२३ मध्ये झाला. जेव्हा ब्रम्होत्सवात मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी वेंकटेश्वरासाठी रेसमी वस्त्र भेट देण्यासाठी आले. ख्रिश्चन धर्माचे पालन करणाऱ्या जगन मोहन यांच्यावर तिरुमला येथील नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप करण्यात आला. मंदिराच्या नियमानुसार जर एखाद्या गैर हिंदूला मंदिरात प्रवेश करायचा असेल तर त्यासाठी नियम १३६ आणि १३७ नुसार फेथ फॉर्म भरावा लागतो. ज्यात संबंधित व्यक्तीला स्वत:च्या धर्माबद्दल माहिती द्यावी लागते आणि मंदिरात प्रवेशासाठी विशेष परवानगी घ्यावी लागते. २००३ साली माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांनी फेथ फॉर्म भरून मंदिरात दर्शन घेतले होते. अर्थात याला अपवाद देखील आहेत. १९९९ साली सोनिया गांधी आणि तत्कालीन मुख्यमंत्री वायएस राजशेखर रेड्डी यांनी या नियमांकडे दुर्लक्ष केले होते.



Source link

andhra pradeshcm chandrababu naiducm naidu master stroketirumala tirupati devasthanams chairmanआंध्र प्रदेशएन चंद्रबाबू नायडूतिरुपती बालाजी मंदिरतिरुमला तिरुपती देवस्थान ट्रस्ट बोर्ड
Comments (0)
Add Comment