जिल्ह्यातील नैना घाट भागातील रहिवासी असलेल्या मदिना खातून यांनी सांगितलं की, त्यांचा मुलगा कालू खान हा गेल्या अनेक वर्षांपासून कुवेतमध्ये राहत आहे. त्यांनी सांगितलं, त्यांना त्यांच्या मुलाबद्दल काहीही माहिती मिळत नाही. त्यांच्या म्हणण्यानुसार, ज्या इमारतीत आग लागली त्याच इमारतीत कालू खान राहत होता.
फोनला उत्तर देत नसल्याने वाढली चिंता
या भागात राहणाऱ्या मदिना खातून यांनी मीडियाला दिलेल्या माहितीनुसार, त्यांचं मंगळवारी रात्री जवळपास ११ वाजता त्यांचं लेकाशी शेवटचं बोलणं झालं होतं. त्याने फोनवर बोलताना आपल्या आईला तो ५ जुलै रोजी दरभंगामध्ये असं सांगितलं होतं. पुढील महिन्यात त्याचं लग्न होतं. पण जेव्हापासून कुवेतमध्ये त्या इमारतीत आग लागल्याच्या घटनेची माहिती मिळाली, तेव्हापासून मी मुलाला फोन करण्याचा प्रयत्न करत आहे. पण तो माझ्या फोनला उत्तर देत नाही. आम्हाला त्याच्याबाबत कोणतीही माहिती मिळत नाहीये.
दूतावास अधिकाऱ्यांना फोटो पाठवला, उत्तराची प्रतिक्षा
मदिना खातून यांनी सांगितलं, की मला कोणतीही कल्पना नाही माझ्या मुलासोबत काय झालं आहे. तो माझा सर्वात मोठा मुलगा आहे. आम्ही याप्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला, पण आमचे प्रयत्न व्यर्थ गेले. आम्ही दूतावास अधिकाऱ्यांना माझ्या मुलाचे फोटो पाठवले आहेत आणि त्यांच्या उत्तराच्या आम्ही प्रतिक्षेत आहोत. आम्ही जिल्हा प्रशासनाशीही संपर्कात आहोत. मदिना खातून यांनी आक्रोश करत, मला माझ्या मुलाबद्दल चांगली बातमी मिळेल अशी प्रार्थना करत असल्याचं म्हटलं.
कुवेतमध्ये मजदूर म्हणून करत होता काम
दरभंगामधील स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, मदिना खातून यांचा मुलगा कुवेतमध्ये मजदूर म्हणून काम करत होता. कुवेत अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवाकी मंगाफ शहरात एका इमारतीत लागलेल्या आगीत जवळपास ४५ भारतीयांचा मृत्यू झाला आहे. एकूण ४९ जण दगावले असून ५० जण जखमी झाले आहेत.