Infinixचा पहिला टॅबलेट असेल ‘Infinix XPAD’, मिड रेंजमध्ये होऊ शकतो लाँच

Infinix Tablet: Infinix ने आकर्षक किमतीत परफॉर्मन्स फोकस्ड डिव्हाईस ऑफर करून आपली छाप पाडली आहे. कंपनी बऱ्याच काळापासून ही स्टॅटेजी फॉलो करत आहे आणि 20 ते 30 हजार रुपयांच्या रेंजमधील चांगले डीवाइसेस लॉन्च केली आहेत. एका अहवालात दावा करण्यात आला आहे की आता Infinix ने आपल्या पहिल्या टॅबलेटवर काम सुरु केले आहे. GizmoChina ने म्हटले आहे की Infinix च्या पहिल्या टॅबचे नाव “Infinix XPAD” असेल. त्याचा मॉडेल क्रमांक X1101B आहे. मात्र, टॅबच्या स्पेसीफिकेशन्सबद्दलची माहिती अद्याप समजलेली नाही.

रिपोर्टमध्ये असा अंदाज वर्तवण्यात आला आहे की, Infinix चा पहिला टॅब मिड-रेंजमध्ये येईल. त्याचे फिचर्स देखील या रेंजमधले असतील. हे सिम कार्डला देखील सपोर्ट करू शकटू, जेणेकरुन युजर्स मोबाईल डेटाच्या मदतीने इंटरनेट ऍक्सेस करू शकतील.

टीव्हीसह अनेक कॅटेगिरीजवर Infinixचे लागले लक्ष

हा ब्रँड स्मार्ट टीव्हीसह अनेक कॅटेगिरीजवर लक्ष केंद्रित करत आहे. अलीकडेच, Infinix चे नवीन बजेट स्मार्ट टीव्ही मॉडेल – 32Y1 Plus भारतीय बाजारपेठेत लॉन्च करण्यात आले आहे. Jio Cinema, Prime Video, Disney+ Hotstar, YouTube सारखी लोकप्रिय ॲप्स त्यात प्री-इंस्टॉल केलेली आहेत. कंपनीचे म्हणणे आहे की चांगल्या साऊंड एक्सपीरियन्ससाठी यात 16W स्टीरिओ स्पीकर सिस्टम देखील आहे. त्याच वेळी, डिस्प्लेची पीक ब्राइटनेस लेव्हल 250 निट्स आहे.

Infinix 32Y1 Plus भारतात 9,499 रुपयांच्या किमतीत लॉन्च करण्यात आला आहे. कंपनीचे म्हणणे आहे की नवीन मॉडेल ई-रिटेलर फ्लिपकार्टद्वारे ऑनलाइन खरेदीसाठी उपलब्ध असेल. नवीन बजेट स्मार्ट टीव्हीची पहिली विक्री 24 जून 2024 रोजी सुरू होईल.

गेमर्ससाठी लाँच केले खास डीवाईस

ब्रँडने गेल्या महिन्यात Infinix GT 20 Pro लाँच केला. त्याची किंमत बँक ऑफरसह (Infinix GT 20 Pro बँक ऑफर) 22,999 रुपयांपासून सुरू होते. Infinix GT 20 Pro MediaTek च्या Dimensity 8200 Ultimate प्रोसेसरद्वारे सज्ज आहे. यात 8GB आणि 12GB LPDDR5X रॅम देण्यात आली आहे. तसेच Pixelworks X5 टर्बो गेमिंग चिप देखील इन्स्टॉल केली आहे. फोनमध्ये X बूस्ट गेमिंग मोड आहे, जो 90fps वर गेम डिलीवर करतो.



Source link

infinixInfinix 32Y1 Plusinfinix new phoneinfinix xpad tabletpad tablexpad tablet release details
Comments (0)
Add Comment