श्वेता शुक्ला असं मृत तरुणीचं नाव असून ती सोमवारी (१० जून) तुलसीराम पुरवा गावात घरात रक्ताच्या थारोळ्यात आढळून आली होती. यानंतर पोलिसांच्या तपासात धक्कादायक माहिती उघडकीस आली. श्वेताच्या पालकांनीच तिची हत्य केल्याचं समोर आलं. तिची सावत्र आई राणीने झोपेत असताना तिचे पाय धरले तर वडील राजेश याने चाकूने तिचा गळा चिरला आणि तिची हत्या केली.
सावत्र आईने श्वेतालासोडून आपल्या मुलाला आणि मुलीला बाहेर पाठवले. नंतर, सोमवारी रात्री या जोडप्याने श्वेताची हत्या केली, अशी माहिती गोंडा एसपी विनीत जैस्वाल यांनी दिली.
कोणाला संशय येऊ नये म्हणून सुरुवातीला राजेशने त्याच्या पुतण्यांना गुन्ह्यात अडकवायचा प्रयत्न करत पोलिसात तक्रार दाखल केली. तपास सुरू होताच, श्वेताचे मामा ब्रिजबिहारी पांडे यांनी राजेश आणि राणी यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली आणि दावा केला की हे दोघे मृत तरुणीवर हुंडा-मृत्यू प्रकरणातील संशयित शिवमशी लग्न करण्यासाठी दबाव आणत होते. हे लग्न जुळवण्यासाठी यांना पैसे मिळाल्याचा आरोपही त्यांनी केला.
जेव्हा पोलिसांनी राजेश आणि राणीची स्वतंत्रपणे चौकशी केली तेव्हा हा गुन्हा उघडकीस आला आणि त्यांनी श्वेताला संपवल्याची कबुली दिली.
श्वेताच्या आईचाही मृत्यू संशयास्पद परिस्थितीत
राणी ही राजेशची तिसरी पत्नी आहे, तिच्याकडे ६.२० एकरपेक्षा जास्त शेतजमीन आहे. राजेशची पहिली पत्नी त्याला सोडून गेली होती. त्यानंतर, श्वेताच्या आईचा २००४ मध्ये रहस्यमय परिस्थितीत मृत्यू झाला. एका वर्षानंतर त्यांने राणीशी लग्न केले.