१९ वर्षीय तरुणीने केली आत्महत्या; सुसाईड नोटमधून धक्कादायक खुलासा

हायलाइट्स:

  • तरुणीने गळफास घेऊन केली आत्महत्या
  • मोबाईलमध्ये ‘पब्जी’ गेमचे अ‍ॅप्लिकेशन सुरू असल्याचे आढळले
  • पोलिसांना घटनास्थळी सुसाईड नोटही आढळली

जळगाव : जामनेर शहरात बारावीत शिकणाऱ्या एका तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या (Jalgaon Girl Suicide) केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. जामनेरमधील दत्त मंदिर परिसरात असलेल्या जहागीरदार वाडा इथं रविवारी सायंकाळी साडेसहा वाजता ही घटना घडल्याची माहिती आहे. नम्रता पद्माकर खोडके (वय १९) असं आत्महत्या करणाऱ्या तरुणीचं नाव आहे.

आत्महत्या करणाऱ्या तरुणीच्या मोबाईलमध्ये ‘पब्जी’ गेमचे अ‍ॅप्लिकेशन सुरू असल्याचे आढळले असून ती कायम मोबाईल पाहत असल्याने तिने या खेळाच्या नादातून आत्महत्या केल्याची चर्चा आहे.

राज्य अंधारात जाण्याचा धोका? महावितरणने नागरिकांना केलं ‘हे’ महत्त्वाचं आवाहन

नम्रता हिचे वडील पद्माकर खोडके डॉक्टर आहेत. ते एका स्थानिक डॉक्टरकडे सहाय्यक डॉक्टर म्हणून काम पाहतात. रविवारी सायंकाळी घरात कुणीही नसताना नम्रता हिने छताच्या पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. तिच्या हातांवर देखील दुखापत केल्याच्या जखमा झाल्या आहेत. ही घटना समोर आल्यानंतर जामनेर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांना घटनास्थळी सुसाईड नोट आढळली आहे.

‘माझ्या मर्जीने आत्महत्या’

नम्रता हिने आत्महत्या करण्यापूर्वी एक सुसाईड नोट लिहिली आहे. त्यात तिने ‘मी माझ्या मर्जीने आत्महत्या करत असून, यात माझ्या घरच्यांचा किंवा कोणाचाही दोष नाही’ असा उल्लेख केला आहे. ही सुसाईड नोट पोलिसांनी तपासासाठी जप्त केली आहे.

मोबाईलमध्ये पब्जी गेम अ‍ॅप्लिकेशन

परिसरातील लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, नम्रता ही कायम मोबाईलमध्ये व्यस्त असायची. तिच्या आत्महत्येची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तिचा मोबाईल ताब्यात घेतला. तेव्हा मोबाईलमध्ये पब्जी गेमचे अ‍ॅप्लिकेशन सुरू असल्याचं दिसून आल्याचं सांगितले जात आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. जामनेर पोलीस ठाण्यात रात्री उशिरा घटनेची नोंद करण्यात आली आहे.

Source link

jalgaon newssuicide caseआत्महत्या प्रकरणजळगावजळगाव क्राइमजळगाव पोलीस
Comments (0)
Add Comment