या ६ देशांमध्ये आहे व्हॉट्सॲपवर बंदी
चीन
चीनची “ग्रेट फायरवॉल” आपल्या नागरिकांसाठी अनेक परदेशी ॲप्स आणि वेबसाइट्सचा प्रवेश बॅन करते. द ग्रेट फायरवॉलने व्हॉट्सॲपवरही बंदी घातली आहे. व्हॉट्सॲपवरील ही बंदी संवादावर नियंत्रण ठेवण्याच्या व्यापक धोरणाचा भाग आहे.
इराण
इराणमध्ये व्हॉट्सॲपवर वेळोवेळी निर्बंध येतात. राजकीय अशांततेच्या काळात कम्युनिकेशन आणि इन्फॉर्मेशनवर कंट्रोल करण्यासाठी इराण सरकारने वेळोवेळी ॲप बॅन केले आहेत.
संयुक्त अरब अमिराती (UAE)
WhatsApp ची व्हॉईस आणि व्हिडिओ कॉलिंग फीचर्स संयुक्त अरब अमिराती (UAE) मध्ये ब्लॉक केली आहेत. लोकल टेलीकम्युनिकेशन कंपन्यांना पाठिंबा देण्यासाठी यूएई सरकारने हे निर्बंध लादले आहेत. मोठी गोष्ट म्हणजे येथील व्हॉट्सॲपवर टेक्स्ट मेसेजिंगची सुविधा आहे. यावर कोणतीही बंदी नाही.
कतार
UAE प्रमाणे कतारनेही व्हॉट्सॲपचे व्हॉईस आणि व्हिडिओ कॉलिंग फीचर ब्लॉक केले आहेत. येथे देखील क्स्ट मेसेजिंगची सुविधा कार्यरत आहे, परंतु देशातील टेलीकम्युनिकेशन कंपन्यांना सपोर्ट देण्यासाठी कॉलवर निर्बंध आहेत.
सीरिया
सीरियामध्ये व्हॉट्सॲपवर बंदी घालण्यात आली आहे कारण सरकारला देशाच्या आतल्या गोष्टी बाहेर पोहोचू नयेत असे वाटते. शिवाय, ही बंदी एका व्यापक इंटरनेट सेन्सॉरशिप धोरणाचा भाग आहे.
उत्तर कोरिया
उत्तर कोरियामध्ये कदाचित जगातील सर्वात कठोर इंटरनेट धोरणे आहेत. नागरिकांचा जागतिक इंटरनेटवर अत्यंत मर्यादित प्रवेश आहे आणि माहितीचा फ्री फ्लो रोखण्यासाठी येथे WhatsApp सारख्या ॲप्सवर बंदी घालण्यात आली आहे ज्यामुळे येथील सरकार कम्युनिकेशनवर नियंत्रण ठेवू शकते.
व्हॉट्सॲपमध्ये येणार मोठे अपडेट, यूजर्सला मिळणार हे फायदे
WabetaInfo नुसार, WhatsApp नवीन फीचर अँड्रॉइड बीटा व्हर्जन 2.24.13.3 वर टेस्ट करत आहे. या बीटा व्हर्जनमध्ये दोन चॅनेल पिन करण्याची सुविधा उपलब्ध आहे. पिन केल्यानंतर, हे चॅनेल चॅनेल टॅबच्या वरती दिसतील.
मेटा-मालकीच्या इन्स्टंट मेसेजिंग ॲप WhatsApp वर एक मोठे अपडेट येत आहे. हे अपडेट व्हॉट्सॲप चॅनलसाठी येत आहे. या अपडेटच्या आगमनानंतर, व्हॉट्सॲप युजर्स अनेक चॅनेल पिन करू शकतील.व्हॉट्सॲप चॅनलच्या या फीचरची चाचणी बीटा व्हर्जनवर केली जात आहे. या बीटा व्हर्जनमध्ये दोन चॅनेल पिन करण्याची सुविधा उपलब्ध आहे. एकदा पिन केल्यावर, हे चॅनेल चॅनेल टॅबच्या वरती दिसतील. कंपनी इतर अनेक फीचर्सची चाचणी करत आहे, ज्यानंतर अनेक चॅनेल एकाच वेळी वाचता येतील. याशिवाय, तुम्ही एकाच वेळी अनेक चॅनेल म्यूट करू शकता.