…तोपर्यंत टोल घेऊ नका! भाजप आमदाराची थेट मंत्री गडकरींना विनंती; रस्त्याचा VIDEO शेअर

नवी दिल्ली: सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या आमदारानं रस्त्याच्या दुरुवस्थेचा व्हिडीओ शेअर केला आहे. रस्ता नीट होईपर्यंत टोल घेऊ नका, अशी विनंती भाजप आमदार मृणाल साईकिया यांनी केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरींना केली आहे. खड्डेयुक्त रस्त्याचा व्हिडीओ साईकिया यांनी त्यांच्या एक्स अकाऊंटवरुन शेअर केला आहे.

आसाममधील भाजपचे आमदार असलेल्या मृणाल साईकिया यांनी पाण्यानं भरलेल्या खड्ड्यांचा व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओमध्ये रस्त्यावर मोठमोठे खड्डे दिसत आहेत. ‘राष्ट्रीय महामार्गाचा टोल रोड ३७. नितीन गडकरी सर, रस्त्याची अवस्था चांगली होईपर्यंत टोल रोड ३७ वरील टोल बंद करा,’ असं आवाहन आमदार मृणाल साईकिया यांनी केलं आहे. साईकिया यांनी त्यांच्या पोस्टमध्ये गडकरींना टॅग केलं आहे.
Chhagan Bhujbal: कोणताही पक्ष लोकशाहीवर चालतो, कोणाच्या घरावर नव्हे; राज्यसभा हुकली, भुजबळ बरंच बोलले
मृणाल साईकिया यांच्या एक्स पोस्टचं नेटकऱ्यांनी कौतुक केलं. ‘सरकारमधील कोणीतरी आवाज उठवला ही गोष्ट चांगली आहे. संपूर्ण राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३७ टोल फ्री करण्यात यावा. रस्त्याची अवस्था सुधारल्यानंतरच टोल सुरु करावा. कारण संपूर्ण रस्त्याची अवस्था अतिशय भयंकर आहे,’ अशी प्रतिक्रिया एका एक्स वापरकर्त्यानं दिली. गडकरींनी अद्याप तरी साईकिया यांच्या पोस्टवर प्रतिक्रिया दिलेली नाही.

भाजप आमदार मृणाल साईकिया यांनी ४ जूनला लोकसभा निवडणुकीच्या निकालादिवशी केलेली पोस्टदेखील लक्षवेधी ठरली होती. त्यात त्यांनी जोरहाट मतदारसंघातून विजयी झालेल्या काँग्रेस उमेदवार गौरव गोगोईंचं अभिनंदन केलं होतं. ‘विजयाबद्दल गौरव गोगोईंचं विशेष अभिनंदन. हा निकाल जोरहाटसाठी अनेकार्थांनी महत्त्वाचा आहे. पैसा, प्रसिद्धी, माजोरडी भाषणं प्रत्येक वेळी निवडणुकीत विजय मिळवून देऊ शकत नाहीत, हे जोरहाटमधील निकालातून सिद्ध झालंय,’ असं साईकिया यांनी पोस्टमध्ये म्हटलं होतं.



Source link

assambjp mlaNitin Gadkariroad filled with potholesखड्डेयुक्त रस्तेटोलनितीन गडकरीभाजप
Comments (0)
Add Comment