बद्रीनाथ हायवेवर भीषण अपघात, २३ भाविकांचा टेम्पो ट्रॅव्हलर अलकनंदा नदीत कोसळला

नवी दिल्ली : उत्तराखंडमधील ऋषिकेश – बद्रीनाथ महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. टेम्पो ट्रॅव्हलरचा वाहनावरील ताबा सुटल्याने भाविकांनी भरलेला टेम्पो ट्रॅव्हलर अलकनंदा नदीत कोसळला. या अपघातात १० हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. तर सात जण जखमी झाल्याची माहिती आहे. घटनास्थळी बचावकार्य सुरू असून बेपत्ता लोकांचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. बद्रीनाथ महामार्गावरील रुद्रप्रयाग इथे हा भीषण अपघात झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, ट्रॅव्हलरमध्ये जवळपास २३ भाविक प्रवास करत होते. ट्रॅव्हलर नोएडाहून रुद्रप्रयागच्या दिशेने येताना हा अपघात झाला. चालकाचा ताबा सुटल्याने ट्रॅव्हरल नदीत कोसळला. त्यानंतर एकच गोंधळ उडाला. लोक मदतीसाठी ओरडू लागले होते. लोकांच्या आवाजानंतर अनेक स्थानिक मोठ्या संख्येने घटनास्थळी पोहोचले.
Kuwait Fire : मन लावून अभ्यास करा! बापाची सूचना, तो कॉल अखेरचा ठरला; कुवेतमध्ये भारतीयाचा मृत्यू
ट्रॅव्हलर नदीत कोसळल्याची माहिती मिळताच बचाव पथक तातडीने घटनास्थळी दाखल झालं आहे. त्यानंतर आता रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे, मात्र नदीचा प्रवाह वेगात असल्याने रेस्क्यू ऑपरेशन करण्यात अनेक अडचणी येत आहेत. स्थानिक पोलीस आणि एनडीआरएफचे पथकाकडून युद्ध पातळीवर रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी या अपघातानंतर शोक व्यक्त केला असून या अपघातग्रस्तांना सर्वतोपरी मदत करण्याचं सांगितलं आहे. तसंच उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनीही दुख: व्यक्त करत या अपघाताची माहिती दिली आहे.

त्यांनी एक्सवर एक पोस्ट करत लिहिलंय, ‘रुद्रप्रयागमधील अपघातातील जखमींना एअरलिफ्ट करुन एम्स ऋषिकेश इथे दाखल करण्यात आलं आहे. जखमींवर चांगल्या उपचारासाठी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत.’

Source link

Badrinath accidenttempo traveller Badrinath rishikesh accidentUttarakhand accident newsUttarakhand Badrinath Highway Accidentउत्तरांखंड ऋषिकेश बद्रीनाथ महामार्ग टेम्पो ट्रॅव्हलर अपघातउत्तराखंड बद्रीनाथ अपघातबद्रीनाथ अपघात
Comments (0)
Add Comment