कंगना रणौतला कानशिलात लगावणाऱ्या महिला कर्मचाऱ्यासोबत राहुल गांधी उभे आहेत? जाणून घ्या व्हायरल फोटोचं सत्य

नवी दिल्ली : बॉलिवूड अभिनेत्री आणि मंडी मतदारसंघातील नवनिर्वाचित भाजप खासदार कंगना रणौतशी संबंधित एक धक्कादायक प्रकरण काही दिवसांपूर्वी समोर आलं. एका महिला सुरक्षा रक्षकाने कंगनाच्या कानशिलात लगावल्याचा आरोप आहे. हे संपूर्ण प्रकरण नुकतंच अमृतसर विमानतळावर घडलं. कुलविंदर कौर असं कंगनाच्या कानशिलात लगावणाऱ्या महिला सुरक्षा कर्मचारीचं नाव आहे. या घटनेनंतर सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये कंगना राणौतला मारणाऱ्या महिला सुरक्षा कर्मचारी कुलविंदर कौरसोबत राहुल गांधी उभे असल्याचा दावा करण्यात आला आला. मात्र न्यूजचेकरच्या पडताळणीत हा दावा खोटा असल्याचं समोर आलं आहे. व्हायरल फोटोमध्ये कुलविंदर कौर नाही, तर राजस्थानच्या माजी आमदार दिव्या महिपाल मदेरणा आहेत.

व्हायरल दाव्यात काय म्हटलयं?

६ जून २०२४ रोजी अभिनेत्री आणि हिमाचल प्रदेशच्या मंडी मतदारसंघातून नवनिर्वाचित भाजप खासदार कंगना रणौतला सीआयएसएफ महिला काँस्टेबल कुलविंदर कौरने कानशिलात लगावली होती. कुलविंदर कौरचं असं म्हणणं होतं, की कंगनाच्या किसान आंदोलनात सहभागी महिलांना पैसे घेऊन आलेल्या म्हटलं होतं, कंगनाच्या त्या विधानाचा कुलविंदर कौरला राग होता.

सीआयएसएफने या घटनेनंतर कुलविंदर कौरला निलंबित केलं असून घटनेचा तपास सुरू आहे. याचदरम्यान आता एक फोटो व्हायरल होत असून या फोटोत सोनिया गांधी, रोहित गांधी आणि प्रियांका गांधी एका महिलेसोबत उभं असल्याचं दिसतं आहे. फोटोतील ही महिला कुलविंदर कौर असल्याचा दावा केला जात आहे.

व्हायरल फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिलंय, की ‘या कुलविंदर कौर आहेत, जिने कंगना रनौतवर हल्ला केला होता. हा फोटो पाहून मागील-पुढील सर्व गोष्ट तुम्ही समजला असाल’
Fact Check : ४ जून रोजी राहुल गांधींच्या उपस्थितीत लाडू वाटण्यात आले? जाणून घ्या व्हायरल व्हिडिओचं सत्य

फॅक्ट चेकमध्ये काय समोर आलं?

न्यूजचेकरने व्हायरल दाव्याच्या पडताळणीसाठी रिव्हर्स इमेज सर्च केली. तपासात राजस्थानच्या ओसिया मतदारसंघातून माजी आमदार दिव्या महिपाल मदेरणा यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा फोटो मिळाला. हा फोटो १४ फेब्रुवारी २०२४ रोजी अपलोड करण्यात आला होता. यादरम्यान एक आणखी एक फोटो अपलोड करण्यात आला होता.

दोन्ही फोटोंमध्ये उपस्थित असलेल्या कॅप्शनमध्ये असं लिहिलं आहे की, ‘राजस्थान विधानसभेत आज पंतप्रधानपदाचा राजीनामा देणाऱ्या आदरणीय श्रीमती सोनिया गांधीजी यांचं राजस्थानमधून काँग्रेस पक्षाच्या राज्यसभेच्या उमेदवाराचा उमेदवारी अर्ज दाखल केल्याबद्दल हार्दिक अभिनंदन. तसंच सोबत आलेल्या श्री राहुल गांधीजी आणि श्रीमती प्रियांका गांधीजी यांचं स्वागत केलं.

यानंतर, आणखी पडताळणी केली असता, दिव्या मदेरणा यांच्या एक्स अकाऊंटवरुन १४ फेब्रुवारी २०२४ रोजी केलेली पोस्ट आढळली. या पोस्टमध्येही व्हायरल फोटो आहे. राजस्थानमधून राज्यसभेच्या उमेदवार म्हणून सोनिया गांधी यांच्या नामांकनादरम्यान हा फोटो काढण्यात आल्याचं फोटोच्या कॅप्शनमध्ये सांगण्यात आलं आहे.

कोण आहेत दिव्या मदेरणा?

दिव्या मदेरणा २०१८ च्या राजस्थान विधानसभा निवडणुकीत ओसिया विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आल्या होत्या. मात्र, २०२३ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला.

निष्कर्ष

न्यूजचेकरने केलेल्या पडताळणीत राहुल गांधींसोबत दिसणारी महिला कुलविंदर कौर नसून माजी आमदार दिव्या मदेरणा आहेत. त्यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंट्स इन्स्टाग्राम आणि एक्सवर हा फोटो १४ फेब्रुवारी २०२४ रोजी शेअर केला होता.

(This story was originally published by Newschecker, and republished by MT as part of the Shakti Collective.)

Source link

fact check newsFact Check rahul gandhiFact Check woman security kulvinder kaurkangana ranaut kulvinder kaur factrahul gandhi divya maderna photo fact checkकंगना रनौत कुलविंदर कौरफॅक्ट चेकराहुल गांधी दिव्या मदेरणाराहुल गांधी फॅक्ट चेक
Comments (0)
Add Comment