Split ACच्या इनडोअर आणि आउटडोअर युनिटमधील अंतर किती असावे आणि त्याचे फायदे काय आहेत ते येथे आहे. आम्ही तुम्हाला याबद्दल सांगणार आहोत, हे अंतर वेगवेगळ्या ब्रँड आणि मॉडेल्सनुसार वेगवेगळे असू शकते, परंतु आम्ही तुम्हाला एका आयडियल अंतराविषयी माहिती येथे माहिती देत आहोत.
इनडोअर आणि आउटडोअर युनिट्समधील अंतर
साधारणपणे, स्प्लिट एसीच्या इनडोअर आणि आउटडोअर युनिटमधील शिफारस केलेले अंतर 15 ते 20 फूट (सुमारे 4.5 ते 6 मीटर) असते. तथापि, एसीच्या वेगवेगळ्या ब्रँड आणि मॉडेल्समध्ये हे अंतर थोडेसे बदलू शकते, त्यामुळे ACच्या कंपनीने दिलेल्या सूचनांचे पालन करणे आवश्यक आहे.
इनडोअर आणि आउटडोअर युनिट्समधील अंतर कमीत कमी इतके ठेवा
इनडोअर आणि आउटडोअर युनिट्समधील मिनीमम अंतर 3 ते 5 फूट (अंदाजे 1 ते 1.5 मीटर) असावे. यामुळे एसीच्या दोन युनिट्समधील केबल आणि पाईपचे कनेक्शन सोपे होते आणि सिस्टमची एफिशिएंसी कायम राहते. इनडोअर आणि आउटडोअर युनिट्स खूप जवळ ठेवू नयेत, कारण यामुळे हवेच्या प्रवाहात समस्या येऊ शकतात. एसीच्या कूलिंगवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो.
इनडोअर आणि आउटडोअर युनिट्समधील मॅक्सीमम अंतर
Split ACच्या इनडोअर आणि आउटडोअर युनिटमधील कमाल अंतर साधारणपणे 50 फूट (सुमारे 15 मीटर) पर्यंत असू शकते. हे अंतर एसीच्या मॉडेलवर आणि कंपनीच्या सूचनांवर अवलंबून असते. जर अंतर जास्त असेल तर एसीच्या कूलिंगवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. लांब पाइपलाइनमध्ये रेफ्रिजरंटचा दाब कमी होऊ शकतो, ज्यामुळे कूलिंग कमी होते. याव्यतिरिक्त, लांब अंतरामुळे इन्स्टॉलेशन आणि मेंटेनन्सचा खर्च देखील वाढू शकतो.