Google अँड्रॉईड फोन्समध्ये आणणार Magic editor, या फिचरच्या मदतीने युजर्स करू शकतील अनलिमीटेड एडीटींग

अँड्रॉईड स्मार्टफोन युजर्ससाठी एक आनंदाची बातमी आहे. गुगलचे मॅजिक एडिटर फीचर आता अनेक अँड्रॉईड फोनवर येणार आहे. पूर्वी ते फक्त पिक्सेल फोन्सपुरतेच लिमिटेड होते पण आता गुगल त्याचे मॅजिक एडिटर फीचर पिक्सेल फोन्सच्या पलीकडे सॅमसंगसह इतर अँड्रॉइड स्मार्टफोन्समध्ये देणार आहे. ऑक्टोबर 2023 मध्ये Pixel 8 सिरीजसह कंपनीने हे फिचर सादर केले होते, Magic Editor पूर्वी खास Pixel फोनसाठी होते आणि Google या फोनवर हे फिचर मोफत देत आहे. तसेच, इतर Android डिव्हाइससाठी, फोटो एडिट करण्यावर लिमिट घालून देण्यात आले आहे. चला तर याबद्दल सविस्तर जाणून घेऊया…

डिवाइसमध्ये हे व्हर्जन अपडेट करावे लागेल

9to5 Google च्या रिपोर्टनुसार, लेटेस्ट व्हर्जन 6.85 वर अपडेट केल्यानंतर मॅजिक एडिटर फिचर पिक्सेल आणि सॅमसंग फोन युजर्ससाठी उपलब्ध होईल. सॅमसंग किंवा इतर ब्रँडच्या फोनसाठी, मॅजिक एडिटरचा वापर 10 एडिटपर्यंत लिमिटेड असेल आणि Google One प्रीमियम प्लॅनची मेंबरशिप घेतल्याशिवाय त्यांना हे करता येईल. अनलिमिटेड एडीटींगसाठी, युजर्स Google One Premium (2TB)ची मेंबरशिप दरमहा 9.99 डॉलर्स (सुमारे 835 रुपये) इतक्या किमतीत घेऊ शकतात, मात्र Pixel फोन युजर्सना कोणत्याही मेंबरशिपशिवाय अनलिमिटेड एडीटींग ऑफर केले जात आहे.

मॅजिक एडिटर म्हणजे काय आणि त्याचे फायदे काय आहेत?

मॅजिक एडिटरच्या मदतीने तुम्ही विविध पद्धतीने तुमचे फोटोज सहज एडिट करू शकता. तुम्ही तुमच्या फोटोजवर केवळ टॅप करून किंवा ड्रॅग करून किंवा पिंच करून त्यांचा आकार किंवा लोकेशन बदलू शकता. यामुळे युजर्ससाठी फोटोंना कंपोजिशनला एडजस्ट करणे सोपे होते जेणेकरून तुम्ही तुमच्यासाठी फोटोजमध्ये सर्वात महत्त्वाच्या असलेल्या गोष्टींवर फोकस करू शकता.

हे टूल तुमच्या फोटोंमधील लाईट आणि बॅकग्राउंड सुधारण्यासाठी सजेशन देखील देते. उदाहरणार्थ, तुमच्या फोटोंना अधिक वाइब्रेंट आणि आकर्षक स्वरूप देण्यासाठी तुम्ही ग्रे रंगाच्या आकाशाला सोनेरी रंगात बदलू शकता. एडिट केल्यानंतर, मॅजिक एडिटर तुम्हाला निवडण्यासाठी अनेक रिझल्ट ऑप्शन्स देखील प्रदान करते. यामुळे यूजर त्यांच्या आवडीनुसार फोटोची निवड करू शकतात.

मॅजिक एडिटर टूल कसे वापरावे

मॅजिक एडिटर वापरण्यासाठी, Google Photos उघडा आणि तुम्हाला एडिट करायचे असलेले फोटो निवडा. मॅजिक एडिटर पर्यायावर टॅप करा आणि नंतर तुम्हाला वापरायचे असलेले एडीटींग टूल निवडा. आपण एडजस्ट करू इच्छित असलेल्या ऑब्जेक्टवर टॅप करा किंवा सर्कल करा, नंतर त्याची पोझिशन बदलण्यासाठी ड्रॅग करा किंवा त्याचा आकार बदलण्यासाठी पिंच करा.

Source link

android features guidegoogle magic editorgoogle magic editor toolmagic editor androidmagic editor android features
Comments (0)
Add Comment