तेजस्वी यादवांच्या मते नितीश कुमारांचा राजकीय इतिहास पाहता ते नेहमी राजकीय भूमिका बदलत असतात. नितीश कुमारांचे असे शांत राहणे म्हणजे काहीतरी कुटील डाव शिजतोय असे विरोधकांना वाटतंय. नितीश कुमारांनी दोन वेळा मोदींचे चरण स्पर्श केले तीच विरोधकांना नितीश कुमारांची कमजोरी वाटते.पण विरोधकांना याची सुद्धा कल्पना आहे की नितीश कुमार जे करतात त्यांचा अंतरात्मा आवाज ऐकून करतात. दुसरीकडे नितीशकुमार यांना विरोधकांचा डाव चांगलाच कळलाय त्यांनी सुद्धा विरोधकांकडे दुर्लक्ष केलंय असे दिसते.
नितीश कुमार राजकरणातले मुरब्बी नेते आहेत राजकरणातील वाईट चांगली परिस्थिती त्यांना चांगली समजते आणि त्यावरुन त्यांना भविष्याचा अनुमान सुद्धा चांगला लावता येतो. भाजपची विजय यात्रा रोखण्यासाठी नितीश कुमार यांनीच विरोधी पक्षनेत्यांची एक फळी बनवून इंडिया आघाडी तयार केली होती. पण इंडिया आघाडीतील अपमानजनक वागणूक पाहून नितीश कुमारांनी इंडिया आघाडीपासून फारकत घेतली. कदाचित नितीश कुमार इंडिया आघाडी सोबत असते तर आज चित्र वेगळे पाहायला मिळाले असते. नितीश कुमारांना आगामी भविष्याची चाहूल आधीच लागली असावी म्हणूच त्यांनी बिहारच्या विधानसभेआधीच इंडिया आघाडीपासून विभिक्त होण्याचा मार्ग निवडला.
नितीश कुमार यांचा स्वभाव थोडा वेगळा आहे त्यांना कधीच कोणीही काहीही बोलले याचा फार फरक पडत नाही.राजकरणात अनेकदा नितीश कुमारांनी स्वत:च्या फायद्यासाठी राजकीय भूमिका बदलेली पाहायला मिळते. भाजपलासुद्धा नितीश कुमारांनी अनेकदा विविध मुद्द्यावरुन घेरले. पण लोकसभा निवडणुकीत नितीश कुमार सातत्याने आता मरेपर्यंत भाजपची साथ सोडणार नाही असे सांगताना दिसत होते. याचीच खातरजमा करण्यासाठी नितीश कुमार मोदींच्या पाय पडताना दिसले.जवळजवळ पाच ते सहा दशक नितीश कुमारांनी राजकरणार घालवलीत. त्यामुळे सत्ताबदलेचा त्यांना चांगला अनुभव आहे.
नितीश कुमारांना सत्तेची चावी चांगलीच कळलेली दिसते कारण त्यांना माहिती आहे इंडिया आघाडीने जरी सोबत घेतले तरी सत्तेत येणे पंतप्रधानपद मिळवणे दिसते तितके सोपे नाही त्यामुळे त्यांनी मुख्यमंत्रीपदाला पसंती देत राज्याचा कारभार चालवणे सोयीस्कर ठरवले आहे.सध्या नितीश कुमारांकडे १२ खासदार आहेत त्यामुळे इंडिया आघाडीत जावून नितीश कुमारांना सत्ता मिळणार नाही याचा त्यांना अंदाज होता त्यामुळे आता नितीश कुमारांना विरोधकांनी कितीही डिवचले तरी नितीश कुमार एनडीएची साथ सोडणे कठीण आहे.