Accident: रील्सचा नाद महागात पडला, महामार्गावरच बाईकवरुन तोल गेला अन् क्षणात अनर्थ घडला

भोपाळ : रील बनवण्याचं वेड हल्ली साऱ्यांच्या डोक्यावर स्वार आहे. रील बनवण्यात सर्वच इतके मग्न होतात की, आपल्या आजूबाजूच्या स्थितीची किंचितशी कल्पना त्यांना नसते आणि यातच काहीजण तर चक्क जोखीम उचलून रील बनवण्याचा प्रयोग करतात. असाच एक प्रयोग मध्यप्रदेशातील अल्पवयीन मुलाच्या जीवावर बेतला आहे.

रस्त्यावर भरधाव बाईक चालवतानाचा व्हिडीओ शूट करण्याच्या नादात या मुलाचा मृत्यू झाला आहे. बाईकवरील नियंत्रण सुटल्याने बाईकस्वार राज वर्मा याचं डोकं रस्त्यावरील डिवाईडरला धडकलं. त्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. घटनेची माहिती कळताच पोलिस घटनास्थळी पोहोचली आणि राजचा मृतदेह ताब्यात घेतला आणि मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी रुग्णालयात पाठवण्यात आला.
Mahadev App: बहुचर्चित महादेव बेटिंग अ‍ॅपचे वाशीम कनेक्शन? पुणे पोलिसांकडून एकाला अटक, भाजपशी संबंध?
घडलं असं की, शनिवारी पहाटे राज वर्मा आणि त्याचे मित्र बाईकवर स्वार होऊन भोपाळच्या लिंक रोडवर गेले होते. यावेळी बाईक चालवताना त्यांनी रील व्हिडीओ देखील शूट केला. तर राज वर्मा याने तो व्हिडीओ सोशल मीडियावर लगेच पोस्ट केला. यानंतर राज लिंक रोडवर भरधाव वेगात बाईक चालवत असताना त्याचे बाईकवरील नियंत्रण सुटले आणि अपघात घडला, यात राजचं डोकं डिवायडरला धडकलं. परिणामी त्याचा अपघातात दुर्दैवी अंत झाला. तर त्याचे मित्र देखील गंभीर जखमी झाले आहेत.
Serious Crime: वर्दळीच्या भागात तरुणाची हत्या, चाकूनं सपासप वार; थरकाप उडवणारी घटना, लोकांची बघ्याची भूमिका
शनिवारी सकाळी पोस्टमॉर्टमची प्रक्रिया पार पडल्यानंतर पोलिसांनी राजचा मृतदेह त्यांच्या कुटुंबीयांना सोपवला आहे. तसेच मृतक राज वर्मा हा सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह होता आणि त्याला रील बनवण्याचा छंद जडला होता, असे पोलिसांनी घटनेनंतर स्पष्ट केले आहे.

Source link

death due to reelHorriffic Accidentreel crazeReel shootsocial media crazeभीषण अपघातमध्यप्रदेशरीलचे तरुणांना वेडरीलमुळे मृत्यूसोशल मीडियाची तरुणांमधील क्रेझ
Comments (0)
Add Comment